घरक्राइमसांगलीतील 'त्या' घटनेचे धक्कादायक सत्य; आत्महत्या नवे हत्याच!

सांगलीतील ‘त्या’ घटनेचे धक्कादायक सत्य; आत्महत्या नवे हत्याच!

Subscribe

सांगलीमधील (Sangli District) मिरज तालुक्यातील (Miraj Taluka) म्हैसाळ (Mhaisal) येथील एकाच कुटुंबातील ९ जणांनी सामुहिक हत्या केल्याने संपूर्ण सांगली हादरले होते. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असताना सुरूवातील सावकारी कर्जापोटी या कुटुंबीयांनी आत्महत्या केल्याचे समोर आले होते.

सांगलीमधील (Sangli District) मिरज तालुक्यातील (Miraj Taluka) म्हैसाळ (Mhaisal) येथील एकाच कुटुंबातील ९ जणांनी सामुहिक हत्या केल्याने संपूर्ण सांगली हादरले होते. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असताना सुरूवातील सावकारी कर्जापोटी या कुटुंबीयांनी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. मात्र पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास केला असता अखेर सत्य समोर आले. या कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. याप्रकरणी मिरज पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे. (two arrest in 9 people commit suicide of one family in mhaisal sangli)

हेही वाचा – कोणता मुख्यमंत्री येणार विठ्ठलाच्या दारी? उद्धव ठाकरे की देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

एका मंत्रिकासह एकाला पोलिसांनी अटक केली आहे. आब्बास महमंदअली बागवान (४८) आणि धीरज चंद्रकांत सुरवशे (३०) अशी त्यांची नावे आहेत. आब्बास महमंदअली बागवान हा मुस्लीम बाशा पेठ, मुलेगाव रोड, सरवदेनगर सोलापूर येथे राहणारा रहिवाशी आहे. तसेच, धीरज चंद्रकांत सुरवशे हा वसंत विहार ध्यानेश्वरी नगर, प्लॉट नं ५९ जुना पुणानाका, सोलापूर येथे राहणारा रहिवाशी आहे.

सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तधनाच्या कारणामुळे हत्या करण्यात आल्याचे समोर आले. दोघांनी या लोकांच्या जेवणात विष घालून त्यांना मारल्याचं तपासात उघड झाले. तसेच, हे दोघे संशयित आरोपी मयतांच्या घरी येत असल्याचेही समोर आले.

- Advertisement -

या घटनेतील मृतांची नावे

डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनमोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा) आणि पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) यांचा समावेश आहे.


हेही वाचा – ‘शिवसेने’कडून प्रस्ताव आल्यावरच विचार करू, कोअर कमिटी बैठकीनंतर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -