Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र आणखी दोन खासदार ठाकरेंची साथ सोडणार; केंद्रीय मंत्र्याने केला गौप्यस्फोट

आणखी दोन खासदार ठाकरेंची साथ सोडणार; केंद्रीय मंत्र्याने केला गौप्यस्फोट

Subscribe

उद्धव ठाकरे यांना राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून धक्क्यावर धक्के मिळत आहेत. आता आणखी एक धक्का त्यांना लवकरच मिळणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडून देण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या हातातून हळूहळू सगळंच काही निसटून जात असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचे समर्थक आमदार-खासदार अस्वस्थ झाल्याचे दिसून येत आहेत. तर यासाठी आता राज्यभरात उद्धव ठाकरे यांच्याकडून जाहीर सभा देखील घेण्यात येत आहेत. पण असे असले तरी ठाकरे यांच्या गटातील आणखी दोन खासदार पक्षातून बाहेर पडणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडून देण्यात आली आहे. पीयूष गोयल यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांच्याकडून हा गौप्यस्फोट करण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून या खासदारांची नावे सांगण्यात आलेली नाहीत.

या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, “महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वात चांगले सरकार आहे. ठाकरेंनी त्यांच्या सरकारच्या काळात प्रलंबित ठेवलेले प्रकल्प आताचे सरकार मार्गी लावत आहे. शिवसेना आमच्यासोबत आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाची साथ सोडली, यासाठी आम्ही जबाबदार नाही.”

- Advertisement -

तसेच, काही मोजके खासदार सोडले तर त्यांचे सर्व खासदार आमच्यासोबत आहेत. आणखी दोन खासदार आमच्या संपर्कात आहेत, अशी माहितीही मला मिळाली असल्याचा गौप्यस्फोट यावेळी गोयल यांच्याकडून करण्यात आला. तर विधिमंडळात हम दो हमारे दोन असेच राहतील. फक्त आडनाव वापरून चालत नाही, आता घराणेशाही चालणार नाही. मेरिटनुसारच देश प्रगती करेल, असा टोलाही त्यांनी यावेळी ठाकरेंना लगावला आहे.

यावेळी पीयूष गोयल यांनी देशातील विविध राजकीय घडामोडींवर देखील भाष्य केले. तसेच त्यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नंबर वन हिरो आहेत, असे म्हणत त्यांचे कौतुक केले. तर येत्या काही वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश आणखी प्रगती करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या काही महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटातील अनेक नेत्यांना आपल्या गळाला लावले आहे. तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील शिवसेनेत (शिंदे गट) सहभागी होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. पण कितीही काही झाले तरी आणि कोणतेही निर्णय दिले तरी खरी शिवसेना ही आमचीच, असे उद्धव ठाकरे यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे.


हेही वाचा – ‘आप’ कर्नाटक विधानसभेच्या सर्व जागा लढवणार; अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

- Advertisment -