घरताज्या घडामोडी'आप' कर्नाटक विधानसभेच्या सर्व जागा लढवणार; अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

‘आप’ कर्नाटक विधानसभेच्या सर्व जागा लढवणार; अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

Subscribe

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीची (Karnatak Assembly Election 2023) घोषणा करण्यात आली आहे. 10 मे ला 224 जागांसाठी या राज्यात निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीसाठी राज्यातील सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीची (Karnatak Assembly Election 2023) घोषणा करण्यात आली आहे. 10 मे ला 224 जागांसाठी या राज्यात निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीसाठी राज्यातील सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार कर्नाटकातील सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. त्यामुळे दिल्ली, पंजाबनंतर केजरीवाल आता कर्नाटक काबीज करण्याचा प्रयत्न करणार आहेत. (Karnataka Assembly Elections Arvind Kejriwal AAP)

आम आदमी पक्ष (AAP) कर्नाटकमध्ये निवडणूक लढवण्याची आधीपासून तयारी करत आहे. केजरीवाल यांनी संघटना देखील निर्माण केल्या आहेत. कर्नाटकमध्ये त्यानी रॅली देखील काढली आहे. केजरीवाल यांनी सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली.

- Advertisement -

अरविंद केजरीवाल यांच्या या घोषणेनंतर निवडणुकीच्या मैदानात आता चार मोठे पक्ष एकमेकांशी लढणार आहेत. त्यानुसार, भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध जेडीएस विरुद्ध आम आदमी पार्टी अशी लढत या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.

आम आदमी पार्टीने दिल्ली आणि पंजाबमध्ये मोठा विजय मिळवला आहे. तसेच, सध्या निवडणुकीच्या मोसमातही आप आघाडीवर आहे. या पक्षाने ८० जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. आतापर्यंत कोणत्याही पक्षाने उमेदवार जाहीर केले नसून केवळ चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

निवडणुकीसाठी भाजपाची विशेष तयारी?

भाजप आणि काँग्रेसमध्ये कर्नाटकमधील लढत होणार असल्याचे सांगितले जात आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) हे प्रचार सभेत सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून नेते राहुल गांधी हे देखील लवकरच प्रचाराला सुरूवात करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – कर्नाटकच्या निवडणुकीचे बिगुल वाजले; पण लक्ष राहुल गांधींच्या प्रचार सभेकडे, कारण…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -