घरमहाराष्ट्रमहाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मतदारांना उद्धव ठाकरेंनी दिला सल्ला

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मतदारांना उद्धव ठाकरेंनी दिला सल्ला

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील मतदारांनी मतदान करताना 'बजरंग बली की जय' असे म्हणत मतदान करावे, म्हणून सांगितले. मग महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी लोकांनी सुद्धा मतदान करताना 'जय भवानी, जय शिवाजी' अशी घोषणा द्यावी, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडण्यास काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. 03 मे) ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हजेरी लावली. पण काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील मतदारांनी मतदान करताना ‘बजरंग बली की जय’ असे म्हणत मतदान करावे, म्हणून सांगितले. मग महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी लोकांनी सुद्धा मतदान करताना ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा द्यावी. आज (ता. 04 मे) उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

एकीकरण समितीने एकी दाखवावी…
काही वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून त्यांच्यावर मतदानाची बंदी घालण्यात आली होती. मग आता निवडणुक आयोगाने धार्मिक प्रचाराच्याबाबतीत काही बदल केले आहेत का? असा प्रश्न यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तर जर का पंतप्रधान मोदी यांच्या सांगण्यावरून ‘बजरंग बली की जय’ अशी घोषणा देत मतदान करण्यात येणार असेल तर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला मतदान देताना महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी लोकांनी सुद्धा मतदान करताना ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा द्यावी, असे आवाहन उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आले आहे. कोणतेही सरकार आले तरी तेथील मराठी लोकांवर भाषिक अत्याचार होत आहे, त्यामुळे एकजूट तुटू न देता एकीची वज्रमूठ एकीकरण समितीने तिथे दाखवून द्यावी असेही ठाकरेंकडून आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

पवारांच्या निर्णयानंतर मी बोलेन…
शरद पवार यांनी पक्षाच्या पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षातील सर्वच नेत्यांनी त्यांती मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या निर्णयाबाबत घटक पक्षातील नेत्यांनी देखील मत व्यक्त केले आहे. पण राष्ट्रवादी पक्षात आधी काय निर्णय घेण्यात येतो, ते पाहूनच मी बोलेन, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आली आहे.

मविआला तडा जाणार नाही..
मविआमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहावर थेट न बोलता उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे मत व्यक्त केले. याबाबत बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक पक्षाला पक्षांतर्गत बदल करण्याचे स्वातंत्र्य आहे. शरद पवारांच्या निर्णयानंतर मी त्यावर बोलेन. माझ्याकडून तरी महाविकास आघाडीला कोणताही तडा जाणार नाही. आणि महाविकास आघाडीला तडा जाईल असं काहीही राष्ट्रवादीत होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

आत्मचरित्र लिहिण्याचा हक्क सगळ्यांना…
शरद पवारांचे (Sharad Pawar) आत्मचरित्र “लोक माझे सांगाती”मध्ये शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंच्या मंत्रालयात दोनदा जाण्यावर टीका करण्यात आली आहे. याबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा हक्क आहे. तसेच मी मुख्यमंत्री म्हणून काय केले हे जगजाहीर आहे. तसेच, शरद पवारांना सल्ला देणारा मी कोण? मी दिलेला सल्ला त्यांना पचनी पडेल का? असेही यावेळी त्यांच्याकडून सांगण्यात आले.


हेही वाचा – पुढील अध्यक्ष कोण? जयंत पाटील स्पष्टच बोलले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -