Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र लोकांचा छळ करणं हे आमचं हिंदुत्त्व नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

लोकांचा छळ करणं हे आमचं हिंदुत्त्व नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

Subscribe

मालेगावः लोकांचा छळ करणं हे आमचं हिंदुत्त्व नाही. तुम्ही अनिल देशमुखांच्या सहा वर्षांच्या नातीची चौकशी केलीत. लालू प्रसाद यादव यांच्या गरोदर सुनेची ती बेशुद्ध पडेपर्यंत चौकशी केलीत, हे तुमचे हिंदुत्त्व आहे का?, असा निशाणा उद्धव ठाकरे यांनी भाजपवर साधला.

मोदींबाबत काही बोललं की लगेच देशाचा अपमान होतो. मोदी म्हणजे देश नाहीत. तुमच्या विरोधात कोणी बोलायचे नाही. लगेच तुम्ही कारवाई करता. एखाद्याच्या कुटुंबाला त्रास देणं. त्याची विनाकारण चौकशी करणं हे तुमचं हिंदुत्त्व आहे. अनिल देशमुखांच्या सहा वर्षांच्या नातीची तुम्ही चौकशी केलीत. काय दोष होता तिचा. लालू प्रसाद यादव यांच्या गरोदर सुनेची तुम्ही चौकशी केलीत. ती बेशुद्ध पडेपर्यंत तुम्ही तिची चौकशी केलीत. ही कोणती पद्धत आहे. आमचे हिंदुत्त्व तुमच्यासारखे नाही. शेंडी, जानव्याचे आमचे हिंदुत्त्व नाही. हेच माझ्या आजोबांनी सांगितलं. माझ्या वडिलांनी सांगितलं. आता मीही तेच सांगतो आहे.

- Advertisement -

रविवारी उद्धव ठाकरे यांच्या जाहिर सभेचे आयोजन मालेगाव येथे करण्यात आले होते. या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर निशाणा साधला.

मालेगावात शोले, उद्धव ठाकरेंचे शिंदे-फडणवीसांना टोले
– शिवसेना ही आमचीच. शिवसेना ही माझ्या वडिलांनी निर्माण केली आहे, मिंध्यांच्या वडीलांनी नाही.
– निवडणूक आयोगाचं गांडूळ करुन टाकण्यात आले आहे. मात्र सुप्रीम कोर्टात अजून न्यायाचे रामशास्त्री बसलेले आहेत. तोपर्यंत लोकशाही जिवंत आहे.
– मिंधे हे उरावर घेतलेलं ओझं, असं चंद्रकांत पाटील म्हणला होते.
– बावनकुळे हे शिवसेनेला फक्त ४८ जागा देणार आहेत. आहो, बावनकुळे तुमच्या आडनावाला शोभेल अशा किमान ५२ तरी जागा द्या.
– हिंमत असेल तर तातडीने निवडणुका घ्या. मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मते मागतो, तुम्ही मोदींच्या नावे मते मागा, बघूया जनता कुणाला कौल देते ते.
भाजप, शिंदे सेनेची 152 कुळे खाली आली तरी ओरिजिनल शिवसेनेचा पराभव करता येणार नाही.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -