शिंदे – ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्या मुंबईच्या ट्राफिक नियमात बदल; हे प्रमुख रस्ते राहणार बंद

PM Modi Mumbai Visit issued a traffic advisory ahead of the prime minister narendra modis visit to mumbai on january 19

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेच्या इतिहास यंदा पहिल्यांदाच दसऱ्याला दोन वेगवेगळे मेळावे होणार आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीच्या मैदानात होणार आहे. तर उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कमध्ये होणार आहे. या दोन्ही मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. आपलीच शिवसेना खरी असल्याचं सिद्ध करण्यासाठी दोन्ही गटाने आपली ताकद पणाला लावली आहे. यामुळे दोन्ही गट अधिकाधिक गर्दी जमवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान दोन्ही गटाकडून होणारी विक्रमी गर्दी पाहता पोलिसांवरील ताण वाढणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दोन्ही मेळाव्यांसाठी मुंबईसह राज्यभरातून शिवसैनिक दाखल होत आहेत. परिणामी मुंबई पोलिसांनी वाढते ट्राफिक लक्षात घेता वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर तसेच कार्यक्रमास्थळी जाणाच्या मार्गांवर वाहनांची मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. यामुळे वाहतूक पोलिसांनी 5 ऑक्टोबर सकाळी 9 वाजल्यापासून ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे.

दसरा मेळाव्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल

या रस्त्यांवर वाहनं उभी करण्यास मनाई

  • स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग हा सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते एस बँक सिग्नलपर्यंत.
  • केळूस्कर रोड (दक्षिण) आणि (उत्तर).
  • दादासाहेब रेगे मार्ग हा सेनापती बापट पुतळा ते गडकरी चौकपर्यंत.
  • एल. जे. रोड हा राजा बडे सिग्नल ते गडकरी जंक्शनपर्यंत.
  • दिलीप गुप्ते मार्ग हा शिवाजी पार्क गेट क्र. ४ ते शीतलादेवी रोडपर्यंत.
  • एम. बी. राऊत मार्ग हा एस. व्ही. एस. रोडपर्यंत.
  • पांडुरंग नाईक मार्ग हा एम. बी. राऊत रोडपर्यंत.
  • एन. सी. केळकरमार्ग हा हनुमान मंदिर ते गडकरी चौकपर्यंत.

या रस्त्यांवर वाहनांना प्रवेश बंदी – पर्यायी मार्ग

  • स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग हा सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते कापड बाजार जंक्शनपर्यंत बंद.पर्यायी मार्ग

    सिद्धिविनायक मंदिर जंक्शन, एस. के. बोले रोड, आगार बाझार, पोर्तुगीज चर्च, गोखले रोड या रस्त्याचा वापर करावा.
  • राजाबढे चौक जंक्शन ते केळूस्कर मार्ग उत्तर जंक्शनपर्यंत बंदपर्यायी मार्ग
    एल. जे. रोड, गोखले रोड- स्टीलमॅन जंक्शनवरून पुढे गोखले रोडचा वापर करावा
  • दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन येथून दक्षिण मार्ग बंद.पर्यायी मार्ग
    राजा बढे जंक्शन येथून एल. जे. रोडचा वापर करावा.

वाहनांची पार्किंग व्यवस्था

इंडिया बुल फायनान्स सेंटर सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टर रोड, कोहिनूर स्क्वेअर कोहिनूर स्क्वेअर, कोहिनूर मिल कॅम्प. दादर याठिकाणी वाहनं पार्क करावी.

पाच गार्डन माटुंगा नाथालाल पारेख मार्ग, एडनवाला रोड, आर. ए. के. रोड, चार रस्ता वडाळा, लेडी जहांगीर रोड, माटुंगा. याठिकाणी मोठ्या गाड्या म्हणजेच बसेस पार्क करता येतील.


उत्तराखंडच्या पौरी गढवाल येथे बस अपघातात 25 जणांचा मृत्यू; SDRF कडून 21 जणांची सुटका