घरमहाराष्ट्र'ते' विधान मागे घेतो, उद्धव ठाकरेच आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादांचा यू-टर्न

‘ते’ विधान मागे घेतो, उद्धव ठाकरेच आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादांचा यू-टर्न

Subscribe

विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या विधानानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अजितदादांनी अनवधानानं का होईना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हटलं होतं. पुण्यातील जिल्हा बँक निवडणुकीतील विजयानंतर अजित पवारांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी हे मोठं विधान केलं होतं. ते म्हणाले होते, महाराष्ट्रातील नागरिकाच्या जिवाशी खेळून चालणार नाही.

पुणेः मी त्यासंदर्भात तसं बोललेलो असलो तरी आदित्य शब्द मागे घेतो. उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असा शब्द घेतो, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतलीय. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आम्ही जसं काही सभागृहात चुकलं की म्हणतो ना की मी तो शब्द मागे घेतो. मला माहीत नाही. गर्दी पण होती, जास्त थांबायचं नव्हतं. तुम्ही तिथे सगळे असताना तसं जाणं उचित दिसलं नसतं. कारण तिथे 50 पेक्षा जास्त लोक होती. पण तसं नाहीये. राज्याचे आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे साहेबच आहेत, असंही अजित पवारांनी अधोरेखित केलंय.

विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या विधानानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अजितदादांनी अनवधानानं का होईना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हटलं होतं. पुण्यातील जिल्हा बँक निवडणुकीतील विजयानंतर अजित पवारांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी हे मोठं विधान केलं होतं. ते म्हणाले होते, महाराष्ट्रातील नागरिकाच्या जिवाशी खेळून चालणार नाही. आरोग्य चांगलं ठेवावं लागेल. त्याठिकाणी रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी केलेली आहे. बाकी सगळं सुरू ठेवलंय. परंतु नियमाचं पालन करून सुरू ठेवलेलं आहे. तशाच पद्धतीनं पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण जर ऑक्सिजनची मागणी फार मोठ्या प्रमाणावर वाढली. तर याबद्दलचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री या नात्यानं आदित्य ठाकरेसाहेब घेतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाल्यानं विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळालं होतं.

- Advertisement -

राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. जे व्हॅक्सिनेशन तीन तारखेपासून सुरू केलंय. तसेच इतर लोकांसाठीसुद्धा दहा तारखेपासून सुरू करण्यात आलंय. पहिल्यांदा जेव्हा लसीकरण करण्यात आले, तेव्हा ग्रामीण भागात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. तसेच तेथील शाळांमध्ये मुलांना बोलावलं जातं आणि लसीकरण केलं जातं. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील देखील विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून लसीकरण केलं तर ते मोठ्या प्रमाणात होईल. कारण 43 टक्क्यांपर्यंत आज लसीकरण पूर्ण झालंय. तसेच आपल्याकडे लसीकरणसुद्धा उपलब्ध आहे. राज्यातील काही भागात लसीकरण उपलब्ध नसलं तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात उपलब्ध आहे, असं अजित पवार म्हणालेत.

——————————————————-
हेही वाचा : बँका चालवणं स्पर्धात्मक, पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -