घरमहाराष्ट्रकातळशिल्पाच्या जागेच्या मातीची चाचपणी केली तर... उद्धव ठाकरेंनी दिला इशारा

कातळशिल्पाच्या जागेच्या मातीची चाचपणी केली तर… उद्धव ठाकरेंनी दिला इशारा

Subscribe

बारसूतील कातळशिल्पाची जागा ही प्रकल्पापासून 100मीटरच्या अंतरावर आहे, त्यामुळे या जमिनीवरील मातीच्या जागेची चाचपणी करण्यात येणार आहे, याबाबतची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

उद्धव ठाकरे हे आज (ता. 06 मार्च) बारसूच्या दौऱ्यावर आहेत. प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलकांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बारसूतील कातळशिल्पांची पाहणी केली. ठाकरे यांना छायाचित्र काढण्याची आवड आहे, याबाबत सर्वांना माहिती आहे. म्हणूनच त्यांनी आवर्जून या ठिकाणाला भेट दिली. बारसूतील कातळशिल्पाची जागा ही प्रकल्पापासून 100मीटरच्या अंतरावर आहे, त्यामुळे या जमिनीवरील मातीच्या जागेची चाचपणी करण्यात येणार आहे, याबाबतची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. तर या जागेच्या मातीची चाचपणी केल्यास गुन्हे दाखल करू असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

हेही वाचा – बारसू रिफायनरी वाद : ‘हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न कराल तर…’, उद्धव ठाकरेंचा इशारा

- Advertisement -

बारसूतील कातळशिल्प पाहिल्यानंतर उद्धव ठाकरे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, या कातळशिल्पाला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात यावे, याबाबतचा प्रस्ताव युनेस्कोकडे दिलेला आहे. ही सुद्धा जागा या वादग्रस्त रिफायनरीमध्ये येते, हे मला हल्ली कळलं. या पठारावरील अनेक अशी कातळशिल्पे आहेत, जी ऐतिहासिक किंवा अश्मयुगीन काळातील असावीत. ज्याप्रमाणे त्यावेळी रिफायनरीसाठी पत्र लिहिले होते. त्याप्रमाणे जागतिक वारसासाठी पत्र लिहिणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

तसेच, ही सुद्धा जागा रिफायनरीच्या जागेत येते, याबाबतची कोणीही कल्पना दिलेली नव्हती. त्यामुळे जर का या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या मातीची चाचपणी झाली तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आलेला आहे.

- Advertisement -

दरम्यान, रत्नागिरीतील बारसू रिफायनरीला स्थानिकांनी प्रचंड विरोध केला आहे. रिफायनरीला नकार देत आंदोलन केले जात आहे. या आंदोलकांची आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीत उद्धव ठाकरे यांनी बारसूतील आंदोलकांशी संवाद साधला. त्यावेळी ठाकरेंनी राज्याकर्त्यांना बारसूत येऊन रिफायनरीचे सर्मथन करून दाखवा असे आव्हान दिले. तसेच, ‘हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न केला तर, ही हुकूमशाही तोडून-मोडून टाकीन आणि महाराष्ट्र पेटवून यांना हकलवीन’, असा इशाराही ठाकरेंनी दिला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -