Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन राव आणि रंभाची ऐतिहासिक प्रेमकथा रुपेरी पडद्यावर

राव आणि रंभाची ऐतिहासिक प्रेमकथा रुपेरी पडद्यावर

Subscribe

हिंदवी स्वराज्य उभे करताना छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना मोलाची साथ लाभली ती म्हणजे निधड्या छातीने लढणाऱ्या शिलेदारांची. ज्यांना फक्त एकच गोष्ट ठाऊक होती ती म्हणजे आपण ‘फकस्त लढायचं, आपल्या राजासाठी अन स्वराज्यासाठी’. इतिहास नेहमीच शौर्याने, पराक्रमाने, तर कधी कधी अनेक षडयंत्रांनी भरलेला असतो. ऐतिहासिक काळातील महान व्यक्तिरेखांवर बेतलेले सिनेमे अलीकडच्या काळात आले आणि त्याला उदंड लोकाश्रयही मिळाला. याच यादीत एका चित्रपटाचा आपल्याला उल्लेख करावा लागणार आहे.

‘रावरंभा’ हा इतिहासाचा काहीसा दुर्लक्षित ‘प्रेम अध्याय’ १२ मे ला मराठी रुपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घडलेली रोमांचकारी प्रेमकथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये अनेक प्रेमकथा गाजल्या. त्यांनी प्रेमासाठी केलेला त्याग, संघर्ष आपल्याला भावतो, अशा शौर्यवान, बुद्धिमान, पराक्रमी.. थोडक्यात हिमालयाएवढ्या व्यक्तिमत्वामागे उभ्या राहणाऱ्या स्त्रीलाही हिमालयाची सावलीच बनावं लागतं हे दाखवून देणारा शशिकांत पवार प्रोडक्शन निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ हा चित्रपट याच यादीत येतो.

- Advertisement -

‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा, संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. देवी सातेरी प्रॉडक्शन्सचे प्रभाकर परब या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. सहनिर्माते डॉ. अजित भोसले आणि संजय जगदाळे आहेत. छायांकन संजय जाधव तर संकलन फैजल महाडिक यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आहेत. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे. वेशभूषा पौर्णिमा ओक, रंगभूषा प्रताप बोऱ्हाडे, कलादिग्दर्शन वासू पाटील यांचे आहे. साहसदृश्ये शेवोलिन मलेश यांची आहेत. व्हीएफएक्सची जबाबदारी वॉट स्टुडिओ आणि जयेश मलकापूरे यांनी सांभाळली आहे. ध्वनीसंकलन दिनेश उच्चील, शंतनू अकेरकर यांचे आहे. प्रशांत नलवडे निर्मिती व्यवस्थापक आहेत.


हेही वाचा :

‘द केरळ स्टोरी’ने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -