घरताज्या घडामोडीपाकव्याप्त काश्मीर २०२४ पर्यंत भारतात येऊ शकतो, केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे...

पाकव्याप्त काश्मीर २०२४ पर्यंत भारतात येऊ शकतो, केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे वक्तव्य

Subscribe

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी महागाईबाबतही वक्तव्य केलं आहे. यावेळी कपिल पाटील म्हणाले की, महागाईचे समर्थन कोणी करु शकणार नाही. कांदे, बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाहीत.

२०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात येऊ शकतो असे विधान केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांनी केलं आहे. तसेच आपण आता कांदे, बटाटे, तूरडाळ यामधून बाहेर पडले पाहिजे असेही वक्तव्य त्यांनी केलं आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी महागाईबाबातही वक्तव्य केलं आहे. कांदे, बाटाट्यांचे भाव कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाहीत असे वक्तव्य केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी कल्यामध्ये एका कार्यक्रमात संवाद साधत होते. यावेळी त्यांनी काश्मीर आणि महागाईबाबत वक्तव्य केलं आहे. कपिल पाटील म्हणाले की, काश्मीरमधील ३७० आणि ३५ ए कलम हटवल्यानंतर विरोधकांनी टीका केली होती. यावेळी टिकांना उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी. व्ही. नरसिंह राव यांनी केलेल्या कायद्याचा दाखला दिला होता. नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांनी पार्लमेंटचे संयुक्त अधिवेशन घेत काश्मीरबाबत कायदा पारित करुन घेतला. पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घेतल्याशिवाय समस्या सुटणार नाही. असे पी. व्ही नससिंहराव यांनी म्हटलं होते. तुमचे काम तुम्हाला जमले नाही म्हणून आम्ही करत आहोत असे मोदींनी सांगितले होते असे कपिल पाटील म्हणाले.

- Advertisement -

कांदा बटाट्यातून बाहेर पडले पाहिजे

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी महागाईबाबतही वक्तव्य केलं आहे. यावेळी कपिल पाटील म्हणाले की, महागाईचे समर्थन कोणी करु शकणार नाही. कांदे, बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाहीत. एकीकडे ७५० किलोने मटण घेतले जाते, ५००-६०० रुपयांचा पिझ्झा घेतला जातो. परंतु दुसरीकडे १० रुपयांचा कांदा, ४० रुपयांचा टोमॅटो आपल्याला महाग वाटत. महागाईचे समर्थन कोणी करणार नाही. परंतु महागाईमागील कारणे समजून घेतली तर त्यांना दोष देणार नाही असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.


हेही वाचा : देश हिंदुत्वाच्या विचाराने नाही तर गांधी विचाराने चालेल –  नाना पटोले

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -