घरमहाराष्ट्रमुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी; 'या' जिल्ह्यांत पाऊस

मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी; ‘या’ जिल्ह्यांत पाऊस

Subscribe

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत आज पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. वीजांच्या गडगडाटासह पावसाची रिमझिम परिसरात पाहायला मिळाली. हवामान विभागाने राज्यात अनेक भागांत आज अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता.

मुंबई: मुंबई, ठाणे, नवी मुंबईत आज पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. वीजांच्या गडगडाटासह पावसाची रिमझिम परिसरात पाहायला मिळाली. हवामान विभागाने राज्यात अनेक भागांत आज अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. (Unseasonal weather in many places in the state including Mumbai Rain in these districts )

अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे सकाळी कामानिमित्त बाहेर निघालेल्या तसेच मॉर्निंग वॉकला निघालेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात आज पहाटेपासून पावसाला सुरूवात झाली. अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, कांदिवली या परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

- Advertisement -

मुंबईत मध्यरात्रीपासून पाऊस

मुंबई आणि मुंबई उपनगरात मध्यरात्रीपासून पाऊस सुरू आहे. वसई, विरार, नालासोपारा परिसरात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे. या भागांत पाऊस सुरू होताच वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

सिंधुदुर्गातही सलग दुसऱ्या दिवाळी पावसानं हजेरी लावली. कुडाळ, कणकवली, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्या. या अवकाळी पावसामुळे अंबा आणि काजू पिकांवरही परिणाम होण्याची चिन्हं आहेत. तर साताऱ्यात पाऊस पडल्याने परिसरातील गारव्यात आणखी वाढ झाली. तसंच, पुढच्या तीन ते चार तासांत मुंबई, पुणे, रायगड या जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

अनेक भागांत यलो अलर्ट

पुणे हवामान विभागाने रविवारी मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. त्यानुसार पावसाला सुरुवात झाली आहे. अजून दोन दिवस राज्यातील काही भागांत पावसाचा यलो अलर्ट असणार आहे. हिवाणी मोसमी वारे व चक्रीय सक्रीय झाल्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. मोसमी वारे महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीकडे आगेकूच करणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात रविवार सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे.

(हेही वाचा: ओबीसी नेत्यांनी माझ्या नादाला लागू नये; प्रकाश आंबेडकरांचा भुजबळाना थेट इशारा )

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -