घरदेश-विदेशLive Update : IND vs AUS 2nd T20 : भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत...

Live Update : IND vs AUS 2nd T20 : भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय; बिश्नोई अन् कृष्णा ठरले विजयाचे हीरो

Subscribe

IND vs AUS 2nd T20 : भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय; बिश्नोई अन् कृष्णा ठरले विजयाचे हीरो


मनमाड-येवला राज्य महामार्गावर स्विफ्ट कार आणि ट्रकचा भीषण अपघात

- Advertisement -

मनमाड-येवला राज्य महामार्गावर झालेल्या अपघातात कारमधील सर्व पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अंकाईजवळील रेल्वे उड्डाणपुलावर हा अपघात झाला असून सर्व प्रवासी हे नाशिकमधील गंगापूरचे आहेत.

- Advertisement -

पालघर, अहमदनगर, पारनेर, महाबळेश्रर, वसई, नाशिक आणि सिन्नरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी


IND vs AUS : भारताचे ऑस्ट्रेलियासमोर 236 धावांचे आव्हान


साताऱ्यानंतर शरद पवारांनी नवी मुंबईतही भर पावसात केले भाषण

नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला बचत गटाच्या मेळाव्याला शरद पवार यांनी हजेरी लावली. या ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा भर पावसात सभेला संबोधित केल्याचे पाहायला मिळाले.


धो-धोन पावसात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भर पावसात केले भाषण

अमृता फडणवीस आणि दिव्या फाऊंडेशनच्यावतीने मुंबईत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 26/11 हल्ल्यात मृत्यू झालेल्या शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्री श्री रवीशंकर आणि मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमात अवकाळी पावसाने विघ्न घातलं आहे. त्यामुळे ऑडिओ सिस्टिम बंद पडल्यामुळे कार्यक्रम थांबवण्याची वेळ आली आहे.


IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने जिंकले नाणेफेक, गोलंदाजीचा निर्णय


धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात काँग्रेसचा मोर्चा

पुनर्विकास प्रकल्प करताना धारावीकरांना विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप, तसेच मोठी टिडीआर घोटाळा झाल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला आहे.


चिखलीच्या तहसीलदारांकडून रविकांत तुपकर यांना उपोषण मागे घेण्याची विनंती

रविकांत तुपकर हे सोयाबीन आणि कापूस प्रश्नावर चिखली तालुक्यातील सोमठाना येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी प्रशासन प्रयत्न करताना दिसत आहे. चिखलीच्या तहसीलदारांनी आज रविकांत तुपकर यांनी भेट घेतली आणि त्यांना अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र रविकांत तुपकर आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.


कल्याण रेल्वे यार्डात उभ्या रिकाम्या बोगीला आग


आता म्हातारा झालोच आहे, भुजबळांचा जरांगेना टोला

जाळायला नव्हे जुळवायला अक्कल लागते .

पिकलेल्या केसांपेक्षा जास्त आंदोलन केली, असं म्हणत भुजबळांनी जरांगेंंना सुनावलं.

ओबीसी महाएल्गार सभेत भुजबळ बोलत आहेत.


ओबीसी सभेला जात असताना भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

ताफा अडवण्याचा प्रयत्न करणारे ताब्यात

भुजबळ ओबीसी एल्गार मेळाव्याला हजेरी


खासदार अनिल बोडेंवर अज्ञाताने मारला दगड

दगड लागल्याने बोंडेंच्या खाद्याला दुखापत


भाजप राज्यात लोकसभेच्या 26 जागा लढवणार 

तर शिंदे गट आणि अजित पवार गट हे 22 जागा लढवणार आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली.


मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात शिंदे, फडणवीस दाखल

26/11 च्या शहिदांना मानवंदना

मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दाखल


राज्यात अनेक ठिकाणी हिवाळ्यात पावसाचे आगमन

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसाक राज्यात पाऊस सुरू झाला आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये गुलाबी थंडी जाणवू लागली असताना शनिवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरू झाला आहे.

मुंबई आणि मुंबई उपनगरात मध्यरात्रीपासून पाऊस सुरू आहे. वसई, विरार, नालासोपारा परिसरात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू आहे.


सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात

सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आठ लोक जखमी झाले आहेत. यातील तीन लोक गंभीर जखमी आहेत.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -