Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी पंतप्रधान - मुख्यमंत्री भेटीतून काही साध्य होणार नाही, मराठा समाजाला झुलवत ठेवण्याचा...

पंतप्रधान – मुख्यमंत्री भेटीतून काही साध्य होणार नाही, मराठा समाजाला झुलवत ठेवण्याचा प्रयत्न – विनायक मेटे

स्वतःची जबाबदारी केंद्र सरकारवर ढकलणे एवढाच या भेटीच्या मागे खरा उद्देश

Related Story

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या बाबतीत घटनांना वेग येताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महाविकास आघाडीमधील इतर प्रमुख नेते दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याचे समजते आहे. पंतप्रधान मोदींच्या भेटीमागे मुख्यमंत्री राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीमध्ये काही साध्य होणार नाही. मराठा समाजाला केवळ झुलवत ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळातील प्रमुख नेते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी गेले आहेत. या भेटीमागे स्पष्टपणाने राजकारण जास्त आणि मराठा समाजाचे विषय कमी असं स्पष्टपणे दिसून येत आहे. जे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की, फेरविचार याचिका दाखल करा तेच आता भोसले समितीने सांगितले आहे. ते न करता अर्ज करण्यासाठी विनंती करायला गेले आहे.

- Advertisement -

मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे असेल तर कायदेशीर प्रक्रिया सुरु करायला हवी परंतु हे न करता राजकारण करण्यासाठी मुख्यमंत्री पंतप्रधान मोदींना भेट घ्यायला गेले आहेत. कोणत्याही गोष्टी कायदेशीरपणाने योग्यरित्या न करता ही भेट आहे. फक्त मराठा समजाला झुलवत ठेवून आम्ही काहीतरी करतो आहे हे दाखव्याचा प्रकार आहे. तसेच स्वतःची जबाबदारी केंद्र सरकारवर ढकलणे एवढाच या भेटीच्या मागे खरा उद्देश दिसतो आहे. आपल्या हातातले निर्णय न घेता दुसऱ्यावर ढकलण्याच्या दृष्टीने ही भेट सुरु आहे. या भेटीने काहीही साध्य होणार नाही आहे. असे मोठे विधान शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधानांच्या भेटीला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकास आघाडीचे शिष्ठ मंडळ दिल्लीत दाखल झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण, जीएसटी परतावा तसेच राजकीय विषयावर चर्चा करण्यात आली असल्याचे समजते आहे. मराठा आरक्षण कायदेविषयक समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, मुख्य सचिव सीताराम कुंटे देखील पंतप्रधानांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यासह दिल्लीत दाखल झाले आहेत.

- Advertisement -