घरमहाराष्ट्रपरळीत रुग्ण ग्रामीण रुग्णालयाची प्रतिक्षा

परळीत रुग्ण ग्रामीण रुग्णालयाची प्रतिक्षा

Subscribe

परळी हे वाडा तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य केंद्र रुग्णांचा मोठा भार घेत असून या आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर होण्याला ऑगस्ट महिन्यात मंजुरी देण्यात आली आहे. मात्र अद्यापही हे आरोग्य केंद्र आहे त्याच रुपात असून दिवसेंदिवस या आरोग्य केंद्रात येणार्‍या रुग्णांची सुविधांअभावी परवड होत आहे.

20 हजार लोकसंख्येला साधारणतः एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते. मात्र परळी आरोग्य केंद्राअंतर्गत तब्बल 65 हजार 603 इतकी लोकसंख्या आहे. 2 हजार लोकसंख्येला उपकेंद्र असायला हवे. पण प्रत्यक्षात येथे 10 हजार इतक्या लोकसंख्येला एक उपकेंद्र आहे आणि साहजिकच हा भार सहन करण्याची क्षमता आरोग्य केंद्रात नाही. दुसरीकडे, आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्तीही करण्याची गरज आहे. असे असतानाही परळी आरोग्य केंद्र रुग्णांना सेवा देत आहे.

- Advertisement -

वाडा ग्रामीण रुग्णालयानंतर त्रिंबकेश्वर मार्गावर परळी हे एकमेव लोकांना आरोग्य सेवा देणारे केंद्र असल्याने आणि यावर असलेला लोकसंख्येचा भार लक्षात घेता 5 ऑगस्ट 2019 ला परळी आरोग्य केंद्राचे 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात रूपांतर होण्याला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र अद्यापही याबाबत काहीही कार्यवाही झाली नसल्याचे दिसून येत असून रुग्णांना आता ग्रामीण रुग्णालयाची ओढ लागली आहे.

परळी आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर झाल्यास साहजिकच सुसज्ज इमारत, सोयीसुविधा, तज्ञ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग, शस्त्रक्रिया विभाग , एक्सरे विभाग, रक्तपेढी अशा अनेक सेवा लोकांना उपलब्ध होतील. ज्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना घरच्याघरी असल्यासारखे वाटेल. शिवाय वाडा आणि ठाणे येथे जाण्याची जोखीम कमी होईल. यासर्व गोष्टी लक्षात घेता तात्काळ परळी आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

सध्या परळी आरोग्य केंद्रात 200 च्या आसपास ओपीडी असून 20 ते 25 महिलांची प्रसूती महिन्याला होत असते. असे असले तरी येथे 5 आरोग्य सेविका, मानिवली येथे आरोग्य सेवक तर अन्य पदे रिक्त आहेत. ज्याचा भार रुग्णांना सेवा देण्यावर येत असतो. शिवाय आरोग्य केंद्राची इमारत नादुरुस्त असून विजेची कामे तातडीने करणे गरजेचे आहे.
—डॉ.यतिष पाटील, वैद्यकीय अधिकारी

ग्रामीण रुग्णालय उभारणे हा खरंतर वरिष्ठ पातळीवरील विषय असून आरोग्य केंद्र अन्य जागी हलवणे आणि आरोग्य केंद्राची जागा ग्रामीण रुग्णालयाला स्थलांतरीत करणे ही एक प्रक्रिया आहे. याबाबत एक ठराव पंचायत समितीच्या बैठकीत घेतला जाईल. मग याबाबत पुढील कार्यवाही होईल.
—डॉ. संजय बुरपल्ले, तालुका आरोग्य अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -