घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसरकारी नोकरीत जायचंय, अधिकारी व्हायचंय? तर मग कला शाखा करेल तुमचा पाया...

सरकारी नोकरीत जायचंय, अधिकारी व्हायचंय? तर मग कला शाखा करेल तुमचा पाया भक्कम : डॉ.प्रा. लोकेश शर्मा

Subscribe

नाशिक : एचपीटी, आरवायके महाविद्यालय २023-24 हे वर्ष गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाद्वारे विद्यार्थी सक्षमीकरणासाठी वचनबद्धतेचे 100 वे वर्ष म्हणून साजरे करत आहे. यानिमित्त महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले जात आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार एचपीटी महाविद्यालयात केली जात आहे, अशी माहिती एचपीटी, आरवायके महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. लोकेश शर्मा यांनी ‘माय महानगर’शी बोलताना दिली. ज्या विद्यार्थ्यांना सरकारी सेवांमध्ये करिअर करायचे आहे त्यांनी कला शाखेमध्ये प्रवेश घ्यावे, असेही ते म्हणाले.

  • एचपीटी महाविद्यालयातील विविध शाखांमधील एकूण उपलब्ध जागा किती आहेत?
    : एचपीटी महाविद्यालयात कला शाखेसाठी 100 जागा असून, विज्ञान शाखेसाठी 225 जागा आहेत.
  • महाविद्यालयात कोणते अभ्यासक्रम सुरु आहेत.
    – बॅचलर ऑफ आटर्समध्ये संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, पॉलिटिकल सायन्स, तर मास्टर्स ऑफ आर्ट्समध्ये मराठी, हिन्दी, इंग्लिश, इतिहास, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, राज्यशास्त्र तसेच बॅचलर ऑफ सायन्समध्ये रसायनशास्त्र, मायक्रोबायोलॉजी, वनस्पतीशास्त्र, झूलॉजी, फिज़िक्स, स्टॅटिस्टिक्स, गणित, इलेक्ट्रॉनिक सायन्स आणि मास्टर्स ऑफ सायन्समध्ये फिज़िक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झूलॉजी, भूगोल हे अभ्यासक्रम आहेत. पीएचडीच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास बॉटनी, केमिस्ट्री, फिज़िक्स, भूगोल, अर्थशास्त्र, इंग्लिश, मराठी, हिंदी, राज्यशास्त्र हे अभ्यासक्रम सुरु आहेत.
  • महाविद्यालयात कोणते विशेष उपक्रम राबविले जातात?
    – एनएसएस, विद्यार्थी मंच, फिल्म क्लब, कला मंच, स्पंदन कल्चर प्रोग्राम, फील्ड व्हिजिट, इंडस्ट्रियल व्हिजिट, मैदानी खेळ, विज्ञान प्रदर्शन, वैद्यकीय शिबिरे, प्लेसमेंट सेल हे उपक्रम राबविले जातात.
  • नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल काय सांगाल?
    – राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार एचपीटी महाविद्यालयात केली जात आहे. नवनवीन बदलांना सामोरे जाण्यासाठी महाविद्यालय सज्ज आहे.
  • महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा कल कोणत्या शाखेकडे अधिक आह?
    – विद्यार्थी कला शाखेला प्रवेश घेण्यास प्राधान्य देत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी बी.ए. इंग्रजी, बी.ए. ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम मॅनेजमेंट, बी. लि. अ‍ॅण्ड सायन्स, बी.ए. मास कम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नालिझमसाठी प्रवेश घेतले आहेत.
  • आगामी काळात विद्यार्थिनी कोणते क्षेत्र निवडावे.
    – ज्या विद्यार्थ्यांना सरकारी सेवांमध्ये करिअर करायचे आहे ते कला शाखेच्या प्रवेशाला प्राधान्य देऊ शकतात. ज्यांना संशोधन, उद्योग आणि तांत्रिक नोकरीत करिअर करायचे आहे ते विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यास प्राधान्य देऊ शकतात. विद्यार्थ्यांनी कल बघून शाखा निवडावी.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -