घरमहाराष्ट्र'उद्धव ठाकरेंना योग्य वेळी उत्तर देणार'

‘उद्धव ठाकरेंना योग्य वेळी उत्तर देणार’

Subscribe

पंढरपुरातील जाहिर सभेत बोलताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होते. पण, उद्धव ठाकरेंच्या या टीकेला योग्यवेळी उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

पंढरपुरातील जाहिर सभेत बोलताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होते. पण, उद्धव ठाकरेंच्या या टीकेला योग्यवेळी उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमामध्ये पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारला. यावेळी काहीशी सावध भूमिका भाजपनं घेतल्याचं दिसून आलं. पाच राज्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भाजपनं मित्र पक्षांशी जुळतं घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवसेनेच्या टीकेला उत्तर देताना काहीशी सावध भूमिका घेतल्याचं पाहायाला मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अमित शहा यांनी देखील उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. शिवसेनेबाबत बोलताना भाजप नेते मात्र काहीसे सावधपणे बोलत आहेत.

वाचा – राम मंदिर, कर्जमाफी हवी – उद्धव ठाकरे

पंढरपुरातील सभेत मोदी, भाजपवर निशाणा

पंढरपुरातील जाहिर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि दुष्काळावरून सरकारला लक्ष्य केलं होतं. यावेळी त्यांनी पहारेकरी देखील चोर आहेत अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं. यावेळी युतीबाबत उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे लक्ष होतं. पण उद्धव ठाकरेंनी युती गेली खड्ड्यात असं विधान करत भाजपवर तोंडसूख घेतलं होतं. त्यानंतर भाजपकडून जशास तसे उत्तर दिलं जाईल अशी अपेक्षा होती. पण, भाजप नेत्यांनी मात्र त्याला कोणतंही उत्तर दिलेलं नाही. त्यावर मुख्यमंत्र्यांना विचारला असता त्यांनी उद्धव यांच्या टिकेला योग्य वेळी उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया दिली आहे. अद्याप देखील शिवसेना – भाजप युतीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

वाचा – ‘मनसे’ खिल्ली, उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ सांगा; १५१ रुपये मिळवा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -