राज्यात पुढील ५ दिवसांमध्ये तीव्र पावसाचा अंदाज, हवामान खात्याचा इशारा

गोव्यापर्यंत मान्सून पोहोचला आहे. महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्यासाठी ५ ते ७ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.  तर तळ कोकणात मान्सुन येत्या दोन ते तीन दिवसांत पोहचणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

heavy unseasonal rain with strong winds Sindhudurg Baramati

राज्यात येत्या काही दिवसांमध्ये तीव्र पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस राज्यात धडकणार असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु पश्चिम बंगालमध्ये सुरु झालेल्या चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर गेला आहे. अजून पर्यंत पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांचीसुद्धा चिंता वाढली आहे. परंतु पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नये अशी सूचना राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. १२ जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (weather department warning Heavy rain forecast in the next 5 days )

पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात १२ जूनपर्यंत तीव्र पावसाचा अंदाज आहे. देशाच्या उत्तरेकडे मान्सून पोहोचला आहे. दरम्यान बंगाल, केरळ, तामिळनाडूमध्ये पाऊस दाखल झाला आहे. हळूहळू महाराष्ट्राकडे येत आहे. येत्या ७ दिवसांत महाराष्ट्रात पाऊस दाखल होऊ शकतो. मध्यम, तसेच तुरळक प्रमाणात पाऊस पश्चिम महाराष्ट्र आणि घाट माथ्यावर पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

मान्सुन आल्याशिवाय पेरणी करु नका – दादा भुसे

मान्सूनचा पाऊस उशिरा येत आहे. त्यामुळे मान्सुनचा रेग्युलर पाऊस पडत नाही. ८० ते १०० मिली पाऊस पडत नाही. तोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, अपुऱ्या पावसामध्ये पेरणी केली तर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येते त्यामुळे शेतकऱ्यांना दादा भुसे यांनी आवाहन केलं आहे.

राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि मराठवाड्यात बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड येथे वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नैऋत्य मोसमी कर्नाटक किनारपट्टीचा बहुतांश भाग व्यापला आहे. परंतु वाऱ्यांनी कर्नाटकमध्ये विश्रांती घेतली असल्याचे दिसत आहे. यामुळे महाराष्ट्राकडील वाटचाल लांबणीवर गेली आहे. गोव्यापर्यंत मान्सून पोहोचला आहे. महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्यासाठी ५ ते ७ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.  तर तळ कोकणात मान्सुन येत्या दोन ते तीन दिवसांत पोहचणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


हेही वाचा : शिर्डी राज्यातील सर्वाधिक स्वच्छ तिर्थक्षेत्र, तर ‘हे’ शहर दुसऱ्या क्रमांकावर