घरमहाराष्ट्रनागपूरWeather Update : उन्हाचे चटके बसत असतानाच विदर्भाला पुन्हा अवकाळीचा इशारा

Weather Update : उन्हाचे चटके बसत असतानाच विदर्भाला पुन्हा अवकाळीचा इशारा

Subscribe

नागपूर : मार्च महिना संपायला 15 दिवस बाकी असल्याने राज्यातील थंडी गायब होत असून तापमानाचा पारा वाढत आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर तर काही जिल्ह्यातील तापमान चाळीसच्या आसपास आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाचे चटक बसत असतानाच हवामान खात्याने विदर्भाला अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. अवकाळी पावसाचा विदर्भातील चार जिल्ह्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणीतही वाढ होणार आहे. (Weather Update Vidarbha is again warned of bad weather just as the heat of the sun is setting in)

हेही  वाचा – Ravindra Dhangekar : वसंत मोरेंना पुण्यातून मविआचे उमेदवार? धंगेकर म्हणतात, मी माघार घ्यायला तयार

- Advertisement -

हवामान खात्याने 16 ते 19 मार्चदररम्यान म्हणजेच उद्यापासून पुढील चार दिवस विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. नागपूरसह अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यातील हवामानात उद्यापासून बदल होण्याची शक्यता आहे. तापमानात वाढ होत असतानाच हवामान खात्याने या जिल्ह्यांना अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यताही वर्तविली आहे.

हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी

हवामान खात्याने शनिवारी विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा आणि रविवारी मरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तविला असून याठिकाणी ‘येलो अलर्ट’ दिला आहे. तर दुसरीकडे नागपूरसह चंदपूर आणि गोंदिया या जिल्ह्यात गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. सोमवारीही भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ दिला आहे. मात्र कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Eknath Khadse : रावेर मतदारसंघातून मी किंवा रोहिणी खडसे उमेदवार नाहीत; एकनाथ खडसेंनी सांगितलं कारण

नुकसानीचे पंचनामे झालेले नसताना पुन्हा अवकाळीचा फटका

विदर्भात नागपूरसह संपूर्ण विभगात तापमानाचा पारा चढायला सुरुवात झाली आहे. नागपूरमध्ये तापमान 38 अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. गेल्या दोन दिवसात राज्यातील सगळ्यात उष्ण वातावरण वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात नोंदवले गेले होते. त्याशिवाय, विदर्भातील काही शहरात 39 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली आहे. नागपूर आणि विदर्भवासीयांना वाढत्या तापमानाचा सामना करावा लागत असतानाच पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. कारण मागील महिन्यात झालेल्या पाऊस आणि गारपीटमुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्या नुकसानीचे पंचनामे अद्याप झालेले नसतानाच आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर अवकाळीचे संकट उभे राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -