घरक्राइमDelhi Liquor Policy Case : केसीआर यांची कन्या कविता यांना ईडीकडून अटक

Delhi Liquor Policy Case : केसीआर यांची कन्या कविता यांना ईडीकडून अटक

Subscribe

नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची कन्या आणि आमदार के. कविता यांना अटक केली. ईडीची टीम के. कविता यांना हैदराबादहून दिल्लीला घेऊन येत आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी, आमदार कविता यांना ईडी अधिकाऱ्यांनी दोन समन्स बजावले होते, मात्र, त्यांनी या समन्सची दखल घेतली नाही. या पार्श्वभूमीवर ईडीने शुक्रवारी ही कारवाई केली.

हेही वाचा – Terror Attack : दोन राज्य होती टार्गेटवर; पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांकडून नवीन खुलासा

- Advertisement -

मनी लॉण्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडीने शुक्रवारी भारत राष्ट्र समितीच्या (BRS) आमदार के. कविता यांच्या हैदराबाद येथील घरावर छापा टाकला होता. त्यानंतर त्यांना ईडीने अटक केली. तत्पूर्वी, कथित दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने त्यांची आधीही चौकशी केली होती. गेल्या वर्षी या प्रकरणी त्यांची तीनदा चौकशी करण्यात आली होती आणि केंद्रीय एजन्सीने मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत त्यांचे जबाब नोंदवले होते. आपण काहीही चुकीचे केलेले नाही. भाजपाला मागच्या दाराने तेलंगणात प्रवेश करता येत नसल्याने भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार ईडीचा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

- Advertisement -

तर, 13 मार्चपर्यंत कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याचे ईडीला आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने बीआरएस नेत्या के. कविता यांना दिलासा दिला होता. यादरम्यान ईडीने 21 फेब्रुवारी रोजी समन्स बजावत कविता यांना 26 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, कविता त्यावेळी ईडीसमोर हजर झाल्या नाहीत.

हेही वाचा – Nirmala Sitharaman : सरकारने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसे उकळले; निर्मला सीतारामन म्हणतात…

याप्रकरणी गुरुग्रामचे व्यावसायिक अमित अरोरा यांना अटक केली होती. अमित अरोरा हे दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्या कारागृहात असलेले मनीष सिसोदिया यांचे निकटवर्ती मानले जातात. अमित अरोरा यांच्या चौकशीदरम्यान कविता यांचे नाव समोर आल्याचे ईडीने म्हटले आहे. कविता यांच्यावर आप नेत्यांना 100 कोटी रुपये मिळवून दिल्याचा आरोप आहे.

हेही वाचा – Supreme Court : SBI च्या अडचणी संपेना, सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बॉण्डवरून पुन्हा फटकारले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -