घरताज्या घडामोडीपश्चिम रेल्वेने प्रवाशांना दिले ८६ कोटी ५३ लाख रुपये रिफंड

पश्चिम रेल्वेने प्रवाशांना दिले ८६ कोटी ५३ लाख रुपये रिफंड

Subscribe

प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यामुळे पश्चिम रेल्वेने प्रवाशांना तब्बल ८६ कोटी ५३ लाख रुपये रिफंड करावे लागले आहेत.

देशभरात करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता २३ मार्च ते ३१ मार्चपर्यंत रेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय रेल्वेमंत्र्यांनी घेतलेला आहे. त्यानुसार मालगाड्या वगळता सर्व प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच या करोनाचा धसका घेत प्रवाशांनी पश्चिम रेल्वे मार्गावरील २२ मार्चपर्यंत १४ लाख ४८ हजार प्रवाशांनी आपल्या तिकिट रद्द केल्या आहे. त्यामुळे प्रवाशांना पश्चिम रेल्वेनी तब्बल ८६ कोटी ५३ लाख रुपयांचा रिफंड आतापर्यंत देण्यात आलेला आहे.

१४ लाख ८४ हजार प्रवाशांनी केल्या रेल्वे तिकीट रद्द

भारतासह संपूर्ण जगात करोना विषाणूने थैमान घातले आहे. या करोना बाधित रुग्णांची संख्या राज्यात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. रेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय रेल्वेमंत्र्यांनी घेतला आहे. त्यानुसार मालगाड्या वगळता सर्व रेल्वे प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे. यात काही प्रवाशांनी अगोदरच तिकीट बुक केल्या होत्या. त्यांना १००% रिफंड रेल्वेकडून देण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार; १ मार्च ते २२ मार्चपर्यंत करोनामुळे रेल्वे प्रवाशांनी रेल्वे प्रवास टाळण्यात आल्याचे दिसून येत आहे. गेल्या २२ दिवसात पश्चिम रेल्वे मार्गावरून तब्बल १४ लाख ४८ हजार प्रवाशांनी आपल्या रेल्वे तिकीट रद्द केलेल्या आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेने ८६ कोटी ५६ लाख रुपये प्रवाशांना रिफंड देण्यात आले आहेत. तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातून १ मार्च ते २२ मार्चपर्यंत ६ लाख १७ हजार ३१३ प्रवाशांनी बुक केलेल्या रेल्वे तिकीट रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेनी या मुंबई विभागातील प्रवाशांना ३९ कोटी ८० लाख रुपये रिफंड परत केलेला आहे.

- Advertisement -

१०० टक्के मिळणार रिफंड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यु घोषित केले होते. त्याला मुंबईसह देशभरात नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. मुंबईतून बाहेर गावी जाणाऱ्या २० हजार ७५५ प्रवाशांनी आपले बुक केलेले रेल्वे तिकीट रद्द करण्यात आले आहेत. त्यांना १ कोटी ४३ लाख ३ हजार ३०३ रुपये परत केले आहे. २३ मार्च ते ३१ मार्चपर्यंत सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या काही प्रवाशांनी आगोदरच तिकीट बुक केले होते. त्यांना १०० टक्के रिफंड दिले जाणार आहेत.


हेही – करोनामुक्त झालेल्या रुग्णनांवर पुन्हा उलटतोय करोना?


Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -