घरताज्या घडामोडीCoronavirus: रक्तदानासाठी आरोग्यमंत्री टोपे यांची हाक

Coronavirus: रक्तदानासाठी आरोग्यमंत्री टोपे यांची हाक

Subscribe

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ रक्तदान शिबीराला टोपे यांची भेट

करोना संसर्गाच्या भीतीतून नियमित रक्तदात्यांची संख्या घटली आहे. रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी रक्तदान शिबिरे आयेाजित करण्याचे रक्त संक्रमण परिषदेकडून सुचना जारी करण्यात आल्या. त्या सुचनांना प्रतिसाद देत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून‌ रक्तदान शिबिराचे सोमवारी आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली.

आपल्याला करोनाचा प्रादुर्भाव टाळायचा असेल आणि पुढे उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेता रक्ताची कमतरता भासणार आहे. त्यामुळे गर्दी न करता १० ते २० लोकांनी मिळून अत्यंत शिस्तीने आणि सामाजिक अंतराचे नियम पाळत रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असे आवाहन टोपे यांनी केले आहे. लालबागचा राजा संस्थानाचे अनुकरण राज्यातील सामाजिक‌ संस्थांनी करावे आणि रक्त पेढ्यांमधील रक्ताची क्षमता वाढवण्यास हात भार लावावा असेही ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – करोनामुक्त झालेल्या रुग्णांवर पुन्हा उलटतोय करोना?

दरम्यान, पहिल्याच दिवशी रक्तदान शिबीरात ११४ जणांनी सहभाग घेतला असल्याचे मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी सांगितले. लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून शालेय वस्तू, ग्रंथालयातील पुस्तके, डायलिसीस सेंटर सारख्या सामाजिक उपक्रमांमधून समाजाशी बांधिलकी या मंडळाने जपली असल्याचे साळवी म्हणाले. सध्या सुट्ट्यांमुळे अनेक नागरिक गावी गेले आहेत. करोना विषाणूची साथ पसरल्याने अनेक रक्तदाते गोंधळात पडले आहेत. पण, रक्तदानातून करोना पसरत नसल्याचे सांगत रक्तपेढ्यांकडून सतत रक्तदानासाठी आवाहन करण्यात येत आहे. राज्यात दर दिवशी जवळपास ४५ ते ५० हजार रुग्णांना गंभीर आजारांच्या तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी अपघातग्रस्तांसाठी आणि थॅलेसिमिया हिमोफिलिया या रक्ताच्या आजारग्रस्त तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी रक्ताची गरज असते. त्यामुळेच रक्तदात्याची करोना विषाणू लक्षणे आणि प्रवासाचा पूर्व इतिहास तपासूनच रक्तदान शिबिरे आयोजित करण्याच्या रक्त संक्रमण परिषदेकडून सुचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार गर्दी न करता, स्वच्छ जागी योग्य अंतर राखण्याचा नियम पाळत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन केले. आगामी ९ दिवस रक्तदान शिबीरात सहभागी होण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

health minister rajesh tope

- Advertisement -

अत्यंत शिस्तीने स्वच्छतेचे पालन करीत सामाजिक अंतर ठेवत सर्व गोष्टींची पुर्ण काळजी घेत हा रक्तदान शिबीर सुरु आहे. आणि त्यामुळेच रक्तदात्यांबरोबरच या शिबीराच्या आयोजकांचेही आभार व्यक्त केले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -