Eco friendly bappa Competition
घर क्राइम सिंधुदुर्ग : व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या 6 जणांना अटक; 22 कोटींचे...

सिंधुदुर्ग : व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या 6 जणांना अटक; 22 कोटींचे ‘तरंगतं सोनं’ जप्त

Subscribe

देवगड पवनचक्की परिसरात सापळा रचून सुमारे 22 कोटी 37 लाख रुपयांच्या व्हेल माशाची उलटी सदृश पदार्थाची तस्करी करणाऱ्या 4 पुरुष आणि 2 महिलांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या 6 जणांना अटक करण्यात गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे. देवगड पवनचक्की परिसरात सापळा रचून सुमारे 22 कोटी 37 लाख रुपयांच्या व्हेल माशाची उलटी सदृश पदार्थाची तस्करी करणाऱ्या 4 पुरुष आणि 2 महिलांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी देवगड पवनचक्की गार्डन परिसरात सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेकडून सापळा रचण्यात आला. यावेळी या भागात संशयास्पद वावरणाऱ्या 4 पुरुष आणि 2 महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांच्याकडे 22 किलो 370 ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी सदृश पदार्थ मिळून आला.

- Advertisement -

या व्हेल माशाच्या उलटीची म्हणजेच 22 किलो 370 ग्रॅम वजनाच्या उलटीची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या दाराप्रमाणे 22 कोटी 37 लाख रुपये इतकी आहे. या 6 आरोपींकडून व्हेल माशाची उलटी सदृश्य पदार्थासह एक चारचाकी आणि एक दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.

या संशयित आरोपींविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४२, ४३, ४४, ४८, ५१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास देवगड पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.


- Advertisement -

हेही वाचा – मुंबईतील खड्ड्यांच्या मुद्द्यावर बॉलिवूड कलाकारांचे तोंडावर बोट, चाहत्यांमध्ये मोठी नाराजी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -