घरमहाराष्ट्रइयत्ता 12 वीच्या परीक्षेचे करायचे काय?

इयत्ता 12 वीच्या परीक्षेचे करायचे काय?

Subscribe

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची राज्यांच्या मंत्र्यांसोबत आज बैठक

१२वीच्या परीक्षांबाबत न्यायालयाकडून येत असलेल्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक आज रविवारी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षण मंत्री तसेच सचिवांसोबत महत्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत देशातील इयत्ता 12 वीच्या परीक्षांबाबत चर्चा केली जाणार आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इयत्ता 12 वीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही? असा पेच शिक्षण विभागापुढे आहे. त्यामुळे याबाबत उद्याच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. इयत्ता 12 वीच्या परीक्षांसोबतच इतर स्पर्धा परीक्षांच्या प्रवेश परीक्षांबाबतही बैठकीत चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील १०वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने आगपाखड केल्याच्या पार्श्वभूमीवर १२ वीच्या परीक्षेचा विचार करण्याची वेळ आल्याचे या बैठकीच्या आयोजनावरून स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

केंद्रीय शिक्षण मंत्री पोखरियाल यांनी ट्विट करून उद्याच्या बैठकीची माहिती दिली आहे. देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंत्री आणि सचिवांसोबत व्हर्च्युअल बैठक घेतली जाणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटमध्ये दिली आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. रमेश पोखरियाल यांच्यासोबतच बैठकीला महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी तसेच केंद्रीय सूचना आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर देखील उपस्थित असणार आहेत.

इयत्ता 12 वीच्या परीक्षांचे काय होणार?
कोरोना प्रादुर्भावामुळे देशात इयत्ता 12 वीच्या परीक्षा अद्याप घेण्यात आलेल्या नाहीत. तसेच अनेक स्पर्धा परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याच विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी याआधीच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून शालेय शिक्षण, शिक्षण मंत्रालय तसेच सीबीएसई विद्यार्थी व शिक्षकांकडून सुरक्षेचा विचार करून परीक्षा कशा घेता येतील यासंदर्भात सूचना मागवल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -