घरमहाराष्ट्रएकनाथ शिंदेंकडे दसरा मेळाव्यासाठी 'ते' 10 कोटी आले कुठून? सुषमा अंधारेंचा थेट...

एकनाथ शिंदेंकडे दसरा मेळाव्यासाठी ‘ते’ 10 कोटी आले कुठून? सुषमा अंधारेंचा थेट सवाल

Subscribe

दसरा मेळाव्यात आमचीच शिवसेना खरी असल्याचे सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. मात्र शिंदेंच्या दसऱ्या मेळाव्यावर विरोधकांकडून टीकास्त्र डागले जात आहे. जे नवखे असतात त्यांना तयारी करावी लागते, शिवसेना गेली 55 वर्षे दसरा मेळावा घेतेय. ही परंपरा आहे. त्यामुळे आम्हाला त्याची तयारी करावी लागत नाही. दुसरे इव्हेंट साजरा करत असतील. शिवसेनेने स्वत:ला सिद्ध केले आहे. दसरा मेळाव्याला परंपरा आहे इव्हेंट नाही. दरवर्षी लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरेंचे विचार ऐकायला येतात. गर्दी जमवणे म्हणजे यशस्वी होणे असं होत नाही. प्रत्येकाला 1 हजार रुपये देणे, खाण्याची सोय करणे, 1400 बसेस आणणे यासाठी 10 कोटी रुपये खर्च करणे हे पैसे एकनाथ शिंदेंकडे कुठून आले? असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, आम्हाला गर्दी जमवण्यासाठी इतकं करावं लागत नाही. शिवसैनिक स्वत:ची पदरमोड करुन मेळाव्याला येतो. त्याला वातानुकूलित बसेसची गरज लागत नाही. दसरा मेळावा एकच आहे. शिंदेंचा इव्हेंट होऊ शकतो. जे भाजपच्या पैशावर गुवाहाटी फिरून आले, भाजपाच्या खोक्यांवर मिजास मारणारे लोक आमचा मेळावा यशस्वी होणार आहे असं म्हणतात तेच महाविकास आघाडी सरकारसोबत होते. गेली 2 वर्षे दसरा मेळावा झाला मग तेव्हा या लोकांनी का सोडलं नाही? असा सवालही अंधोरेंनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

तसेच खोके दिल्यावर हिंदुत्वाचा साक्षात्कार झाला. काँग्रेस – राष्ट्रवादीचे लोक मेळाव्यात येतील की नाही माहिती नाही. परंतु महाराष्ट्रातील पुरोगामी संघटना, चळवळी ज्याला उद्धव ठाकरेंचे संयमी नेतृत्व आवडलंय. ज्याला भाजपाचा राग, शिंदे गटाची चीड आहे तो मेळाव्याला येईल. संविधानाची चौकट अबाधित ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे सक्षम नेतृत्व आहे. केवळ शिवसैनिक नाही तर उद्धव ठाकरेंचे विचार पटले आहेत तो मेळाव्याला उपस्थित राहिलं. असंही अंधारे म्हणाल्या.

भाजपची स्क्रिप्ट एकनाथ शिंदे वाचणार आहेत. कागद समोर घेत बाळासाहेबांनी भाषण केले नाही. एकनाथ शिंदे कागद समोर ठेऊन भाषण करतात. नारायण राणेंचे मानसिक संतुलन ढासळत असून त्यांची काळजी वाटते. जे हिंदुत्व राणेंचे आता जागे झाले ते10 वर्षे सोनिया गांधींकडे सरेंडर करुन कुठल्या खुर्चीला टांगून ठेवले होते असा सवालही सुषमा अंधारे यांनी राणेंना केला आहे.


‘दसरा मेळावा स्वाभिमानाचा’, सभेच्या काही तासं आधी शिंदे गटाचा नवा टीझर


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -