घरताज्या घडामोडीNisarg Cyclone : कोकणात धुमाकूळ घालून वादळ गेलं, पण गेलं कुठे? वाचा!

Nisarg Cyclone : कोकणात धुमाकूळ घालून वादळ गेलं, पण गेलं कुठे? वाचा!

Subscribe

बुधवारी दिवसभर महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीने निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा अनुभवला. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, महाड, अलिबाग, मुरूड या किनारी भागाला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. अनेक ठिकाणी घरांचे छप्पर उडून गेले. मोठ्या संख्येने झाडं उन्मळून पडली. जवळपास ६ तास पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाचं थैमान सुरू होतं. आणि पुढचे ६ तास ते शांत होण्यासाठी गेले. हवामान विभागानंच रात्री १२ वाजेनंतर चक्रीवादळाचे परिणाम पश्चिम किनारपट्टीवरून कमी व्हायला सुरुवात होईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर देखील अनेक भागांमध्ये पाऊस पडतच असल्याचं दिसून येत आहे. हे वादळ पश्चिम किनारपट्टीवरून मुंबईच्या दिशेने सरकेल, असं आधी म्हटलं गेलं. पण ऐनवेळी त्याने दिशा बदलून नाशिक, धुळ्याच्या रस्ता धरला. पण पश्चिम किनारपट्टीवर धुमाकूळ घालणारं हे वादळं नक्की पुढे गेलं कुठे?

तुफान आलंया!

- Advertisement -

विंडी डॉट कॉम या वेबसाईटवर या चक्रीवादळाचा पुढचा प्रवास अंदाजित केला गेला आहे. खरंतर मुरूडला धडकल्यानंतर आणि कोकण किनारपट्टीवर थैमान घातल्यानंतर निसर्ग चक्रीवादळाचा वेग कमी झाला. त्याचा जोर देखील कमी झाला. त्यामुळे किनारपट्टीवर ज्या वेगानं ते धडकलं आणि जितकं थैमान त्यानं घातलं, तेवढं कार्यक्षम ते पुढच्या प्रवासात राहणार नाही हे स्पष्ट झालं होतं. पण ज्या भागांमधून ते जाईल, तिथे सोसाट्याचा वारा आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, मुरूडला धडक दिल्यानंतर चक्रीवादळानं मुंबईकडे न जाता खोपोली-कामशेत करत मनमाडमार्गे पाचोऱ्यापर्यंत गेलं.

Nisarg Cyclone – चर्चा खूप झाली, पण वादळ मुंबईत आलं का नाही? वाचा!

- Advertisement -

बुधवारी मध्यरात्री ते धुळे, पाचोरा, जळगाव या भागाच्या आसपास पोहोचल्यानंतर त्या भागात देखील पावसानं जोरदार हजेरी लावली. तोपर्यंत त्याचा जोर अजून कमी झाला. गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास वादळ महाराष्ट्राच्या सीमेतून बाहेर पडून मध्य प्रदेशच्या सीमेमध्ये बुऱ्हाणपूरच्या दिशेने गेलं. सकाळी ७ च्या सुमारास त्याने खांडवा गाठलं. तिथे वारा आणि पावसाची हजेरी लावल्यानंतर पुढे मध्य प्रदेशातल्या हर्डाच्या दिशेनं निसर्ग चक्रीवादळ पोहोचलं असून गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत वादळानं हर्डाच्या पुढे इटारसी – होशंगाबादच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे. पुढे जबलपूर अलाहाबाद मार्गे हे वादळ थेट नेपाळमध्ये काठमांडूच्या दक्षिणेकडच्या पर्वतरांगांमध्ये विरून जाईल असा अंदाज ‘विंडी’नं वर्तवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -