फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापासून रोखणारी अदृश्य शक्ती कोण? संजय राऊतांचा खोचक सवाल

फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापासून रोखणारी अदृश्य शक्ती कोण हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे, असा खोचक सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे.

sanjay raut

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बहुमत चाचणी यशस्वी करणाऱ्या अदृश्य शक्तींचे आभार मानले आहेत. शिंदे हे किती मजबूत, महान नेते आहेत, यावर त्यांनी भाष्य केले. पण फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापासून रोखणारी अदृश्य शक्ती कोण हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे, असा खोचक सवाल शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे. (Who is the invisible force that prevented Fadnavis from taking oath as Chief Minister? Sanjay Raut’s sharp question)

हेही वाचा – ‘त्या’ चार लोकांमुळेच गेले अडीच वर्ष तुम्ही सत्तेत राहिलात, संजय राऊतांचे प्रत्युत्तर

महाराष्ट्रातही अनेक विश्वासराव पळून गेले

संतोष बांगर हे हिंगोलीचे आमदार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने उभे राहिले व चोवीस तासांत असे काय घडले की, विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी हे निष्ठावान शिंदे गटाच्या कॅम्पात शिरले. शिवसेनेत राहिल्याबद्दल या निष्ठावान आमदाराचे हिंगोलीत लोकांनी भव्य स्वागत केले. त्यांच्या निष्ठेवर लोकांनी फुले उधळली. आमदार म्हणून विजयी झाले तेव्हाही लोकांनी असे केले नव्हते, असे सांगून कपाळास उटी-चंदन लावलेले बांगर रडू लागले. तेच बांगर सोमवारी शिंदे गटात पळून गेले. त्यामुळे विश्वास फक्त पानिपतातच पडला असे नाही, तर प्रत्यक्ष महाराष्ट्रातही अनेक विश्वासराव पळून गेले, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा – मनी लॉन्ड्रिंग प्रकरण: भावना गवळींचे सहकारी सईद खान यांना जामीन मंजूर

यात काहीतरी काळंबेरं

भारतीय जनता पक्षाचे लोकच हे सरकार ठरल्यानुसार खाली खेचतील आणि महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुकांच्या खाईत ढकलतील. शिंदे यांच्या फुटीर गटास शुद्ध हेतूने सत्तेवर बसवण्याइतके या मंडळींचे मन मोठे नाही. १०६ आमदारांचा मुख्यमंत्री होत नाही आणि ३९ बंडखोरांचा मात्र मुख्यमंत्री होतो, यात काळंबेरं आहे, असा जो इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला त्याचा गभितार्थ शिंदे गटात गेलेल्यांच्या आज लक्षात येणार नाही.

हेही वाचा – रुकने वाला वजह ढुंढता हैं, और…, बंडखोर आमदारांसाठी राऊतांचं ट्विट

… सहा महिने सत्ता भोगा

शिंद्यांचं बंड म्हणजे दशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे बंड नाही व त्यांच्या सोबत जे बंडखोर गुळाच्या ढेपेस चिकटले ते म्हणजे कोणी क्रांतिवीर नाहीत. बंडखोरांचे बोलणं व डोलणे काही दिवसांचे आहे. सत्ता व संपत्ती यासाठी झालेले बंड ऐतिहासिक व तात्विक नससते. त्यास नीतिमत्तेचा काहीही मुलासा दिला तरी त्या बंडाला तेज प्राप्त होत नाही. भाजपने घडवून आणलेल्या बंडाची तीच स्थिती आहे. बहुमत जिंकले, सहा महिने सत्ता भोगा. हाच सगळ्याचा गोषवारा आहे.