बंडाचा निर्णय का घेतला; एकनाथ शिंदे यांनी सांगितले कारण, वाचा सविस्तर

"माझ्या नांदगाव मतदारसंघातील विविध विकास योजना मार्गी लागल्या पाहिजेत यासाठी मी हा निर्णय घेतला आहे'', असे एकनाथ शिदे (Eknath Shinde) यांनी म्हटले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड (Rebel MLA) पुकारला.

“माझ्या नांदगाव मतदारसंघातील विविध विकास योजना मार्गी लागल्या पाहिजेत यासाठी मी हा निर्णय घेतला आहे”, असे एकनाथ शिदे (Eknath Shinde) यांनी म्हटले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड (Rebel MLA) पुकारला. या बंडानंतर शिवसेनेचे नेते (Shiv sena) आणि कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी आपण बंड केल्याचे कारण सांगत आरोप आणि टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. (Why the rebellion was decided Because Eknath Shinde said read in detail)

ट्विटरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. “वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत. माझ्या नांदगाव मतदारसंघातील विविध विकास योजना मार्गी लागल्या पाहिजेत यासाठी मी हा निर्णय घेतला आहे”, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

तसेच, “एकनाथजी शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही. याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि सर्व शिवसैनिकांनी बळी पडू नये ही विनंती….”, असे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी म्हटले.

दरम्यान, आज, मंगळवारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. अनिल देसाई आणि संजय राऊत यांनी शिवसेनेच्या संपर्कात २० आमदार असल्याचे म्हटले आहे.

अजूनही वेळ गेलेली नाही

आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनीदेखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत, आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो, कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणालेत. उद्धव ठाकरेंनी प्रसिद्धीस पत्रक देऊन हे शिंदे गटातील बंडखोरांना आवाहन केलं आहे.


हेही वाचा – अजूनही वेळ गेलेली नाही, आपण मार्ग काढू, उद्धव ठाकरेंचं बंडखोरांना आवाहन