घरताज्या घडामोडीवाघांच्या वाढत्या मृत्यूमुळे 'राज्य वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा' स्थापन करा - रोहित...

वाघांच्या वाढत्या मृत्यूमुळे ‘राज्य वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा’ स्थापन करा – रोहित पवार

Subscribe

देशात वाघांच्या मृत्यूची संख्या सलग दोन वर्षांपासून वाढत आहे. वाघांच्या मृत्यूच्या प्रमाणात गेल्या वर्षांच्या तुलनेत १५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील ६ महिन्यात ८६ वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून यामध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे, अशाप्रकारचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले. त्याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी राज्य शासनाकडे एक मागणी केली आहे. ‘राज्य वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा’ स्थापन करण्याबाबत राज्य शासनाने प्रयत्न करावेत, असे रोहित पवार म्हणाले आहे.

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. ज्यामध्ये ताडोबा, नवेगाव नागझिरा, सह्याद्री, मेळघाट, बोर, पेंच यांचा समावेश आहे. परंतु दुर्दैवाने राज्यात वाघांच्या मृत्यूचं प्रमाणही मोठं आहे. जानेवारी ते मे २०२१ या दरम्यानच्या काळात देशात झालेल्या एकूण वाघांच्या मृत्यूंपैकी जवळपास ६० टक्के हून अधिक मृत्यू हे केवळ महाराष्ट्रात झाल्याचे निदर्शनास आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे मृत्यू झालेल्या वाघांपैकी निम्माहून अधिक वाघांचा मृत्यू शिकार किंवा तत्सम गुन्हे या कारणांनी झाले आहेत. काही घटनांमध्ये वाघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे व्याघ्र संवर्धनाच्या कामात मोठा अडथळा निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय वन्यजीव गुन्हे शाखेच्या शिफारशीनुसार राज्यातही ‘राज्य वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा’ स्थापन करण्याबाबत राज्य शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.

- Advertisement -

यापूर्वी रोहित पवारांनी ट्विट करून इंधन दरवाढीच्या विरोधात केंद्र सरकारवर टीका केली. ‘महागाईच्या ओणव्यात आज सामान्य माणूस भाजून निघतोय, पण चक्क दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नाहीत. कदाचित आजपासून सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनात टीकेची तीव्रता कमी व्हावी म्हणून ते स्थिर असावेत. पण काही का असेना. यामुळं केंद्र सरकारचे मानावे तेवढे आभार कमी आहेत’ अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पेगाससच्या म्हणण्यानुसार ते सॉफ्टवेअर भारत सरकारने विकत घेत वापर केला – जितेंद्र आव्हाड


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -