घरमहाराष्ट्रधनंजय मुंडे यांना पक्षाकडून तूर्तास दिलासा

धनंजय मुंडे यांना पक्षाकडून तूर्तास दिलासा

Subscribe

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर पक्षीय पातळीवर निर्णय घेण्यासाठी १५ जानेवारीला राष्ट्रवादीने मुंबईत बैठक

बलात्काराचे गंभीर आरोप झालेल्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर पक्षीय पातळीवर निर्णय घेण्यासाठी काल रात्री उशिरा राष्ट्रवादीने मुंबईत बैठक घेतली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप केलेत ते गंभीर असल्याचीही चर्चा झाली. मात्र, त्याच बरोबर ही महिला ब्लॅकमेलिंग करत असल्याची बाब समोर आली असल्याची चर्चा या बैठकीत झाली. त्यामुळे तूर्तास धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असा निर्णय पक्षाने घेतला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या बैठकीत धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली आणि पक्षाचा पूर्णपणे धनंजय मुंडे यांना पाठिंबा असल्याचे दिसतंय.

- Advertisement -

धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप

सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. संबंधित तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण देखील दिलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वत: रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचा खुलासा केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -