घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसत्तेविना विरोधकांची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी : सदाभाऊ खोत

सत्तेविना विरोधकांची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी : सदाभाऊ खोत

Subscribe

नाशिक : राज्यातील विरोधी पक्ष हातातून सत्ता गेल्याने एकदम पिसाळलेल्या कुत्र्यासारखा वागत आहेत, अशी जहरी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. ज्या साखर कारखान्यांनी एफआरपी दिलेला नाही, त्यांच्यावर फौजदारी स्वरपाची कारवाई तसेच, संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. राज्यातील विरोधी पक्षाची परिस्थिती पाहता एकमेकांवर चिखलफेक करण्यात धन्यता सुरू आहे. याशिवाय कायद्याचे राज्य असताना खंजीर खुपसण्याच्या गोष्टी केल्या जात असतील तर याला राज्यातील विरोधी पक्ष जबाबदार आहे, असा थेट आरोपही त्यांनी केला.

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत हे सोमवारी (दि.७) नाशिक दौर्‍यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राज्यभरातील शेतकर्‍यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी दौरा करणार असल्याचे नाशिकमध्ये जाहीर केले. ते यावेळी म्हणाले की, रयत क्रांती संघटनेच्या राज्यव्यापी दौरा सुरू झाला असून, नाशिकमधून शुभारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात खानदेश आणि विदर्भचा समावेश असून, या दौर्‍यात शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर पीक परिस्थितीची पाहणी करणार आहोत. या दौर्‍याचा समारोप पुणे शहरात होणार आहे. अतिवृष्टी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, मात्र तरीदेखील विरोधी पक्ष सत्ता गेल्याने पिसाळलेला आहे. विरोधी पक्ष सर्वसामान्य नागरिकांबाबत बोलायला तयार नाही. दरम्यान, मित्रपक्ष शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी भाजपसोबत असून योग्य न्याय मिळेल अशी आशा सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली. सरकार चालवण्यादृष्टिने योग्य निर्णय घेतला जाईल अशी आशा असून, मंत्र्यांनी संकटाच्या काळात जागरूकपणाने काम करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -
कांदा दराबाबत ठोस भूमिका महत्वाची

आदित्य ठाकरेंना लक्ष्य करत ते म्हणाले की, आदित्य ठाकरेंना आडमार्गाने का होईना चांगली संधी मिळाली होती. मात्र, ती संधी हुकली आहे. संकटाच्या काळात शेतकर्‍यांपर्यंत जाणे गरजेचे होते. जेव्हा करण्याची वेळ होती, तेव्हा केले नाही. आता दौरे करण्याऐवजी सत्ता असताना दौरे गरजेचे होते. आता दौरे करून काय फायदा, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांना लगावला. पहिल्या दौर्‍यादरम्यान योग्य निर्णय झाला नाही तर पहिल्या टप्यानंतर नाशिकमध्ये कांदा परिषद घेऊ, त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -