घरमहाराष्ट्रसापुतारा: सेल्फी काढणं जीवावर बेतलं; महिला थेट दरीत कोसळली

सापुतारा: सेल्फी काढणं जीवावर बेतलं; महिला थेट दरीत कोसळली

Subscribe

सेल्फी काढताना लक्ष विचवलीत झाल्याने महिला खोल दरीत कोसळली

हल्ली सर्वच तरूणांना सेल्फीचे व्यसन लागले आहे. मात्र, हे अती सेल्फी काढण्याचे वेड जीव धोक्यात घालू शकते. असाच एक प्रकार नाशिकमध्ये राहणाऱ्या महिलेसोबत घडला आहे. या सेल्फीच्या नादात काहींनी आपला जीवदेखील गमावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सापुताऱ्याला अशाच एका दुर्घटनेत सेल्फीने महिलेचा जीव घेतला आहे. नाशिकची एक महिला थेट दरीत कोसळली आहे.

- Advertisement -

अशी घडली घटना

सेल्फी काढण्याचे वेड असणाऱ्या या महिलेचे नाव सुषमा मिलिंद पगारे असे आहे. सेल्फी काढताना महिलेचा पाय उंच टोकावरून घसरला. यानंतर ती महिला तिथल्या खोल दरीत कोसळली. मात्र उंचावरून कोसळून देखील सुदैवाने या महिलेचा जीव बचावला. जीव वाचला आसला तरी, ही महिला गंभीर जखमी आहे. सेल्फी काढताना दरीत पडलेल्या या महिलेला दरीतून बाहेर काढत उपचारासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


हेही वाचा – ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’तील भीम बिबट्याचा मृत्यू

यावेळी घडली ही घटना

गुजरात राज्यातील सापुतारा इथे आपल्या कुटूंबासमवेत फिरण्यास आलेली नाशिकची महिला सुषमा मिलिंद पगारे या सन राईस पांईटवर लॉरी मल्ला चालवत नैसर्गिक सौंदर्याचे फोटो सेल्फीद्वारे काढत होत्या. यावेळी त्यांचं अचानक लक्ष विचलित झालं आणि पाय घसरून खोल दरीत पडल्या. परंतु, दैव बल्लवतर म्हणून ही महिला या अपघातातून वाचली. उंचावरून खोल दरीत पडल्यामुळे सुषमा यांना गंभीर दुखापत झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -