घरताज्या घडामोडीधक्कादायक! पुण्यात एका दिवसात आढळले २०८ नवे कोरोना रुग्ण; ७ जणांचा मृत्यू

धक्कादायक! पुण्यात एका दिवसात आढळले २०८ नवे कोरोना रुग्ण; ७ जणांचा मृत्यू

Subscribe

पुण्यात एका दिवसात २०८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून मुंबई आणि पुणे ही शहरे हॉटस्पॉटवर आहेत. तर पुण्यामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. तर चिंतेची बाब म्हणजे आज पुण्यात दिवसभरात २०८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. यामुळे ४ हजार १०७ एवढी रुग्णसंख्या झाली आहे असून आज अखेर २२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, उपचार घेतलेल्या १५९ रुग्णांची पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्यामध्ये त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. तर २ हजार १८२ रुग्ण करोनामुक्त झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, वाढती रुग्णसंख्या आणि मृतांची वाढ ही पुणेकरांच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरली आहे.

- Advertisement -

देशात १ लाख १२ हजार ३५९ कोरोनाबाधित

देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आता कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १२ हजार ३५९ वर गेली आहे. तर ६३ हजार ६२४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे ३ हजार ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यता आली आहे. तर जगभरात अन्य देशांच्या तुलनेत भारतात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात केंद्राला यश आल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून केला गेला आहे. १ लाख लोकसंख्येमागे जगभरात ६२.३ करोना रुग्ण आढळले आहेत. पण, भारतात ही संख्या केवळ ७.९ इतकीच आहे, असे केंद्रीय आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी सांगितले.


हेही वाचा – भारतात २४ तासांत ५ हजार ६०९ नवे कोरोना रुग्ण; १३२ जणांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -