घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअनेक वर्षांची प्रतीक्षा संपली; अखेर, निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडले जाणार

अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली; अखेर, निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडले जाणार

Subscribe

अकोले/संगमनेर : उत्तर अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणार्‍या निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३१ मे रोजी घेण्यात येणार आहे. पाच तालुक्यांचे लाभक्षेत्र असलेल्या शेतकर्‍यांसाठी हा ऐतिहासिक क्षण असणार आहे, असे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या कार्यस्थळावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी अधिकारी-कर्मचार्‍यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जलसंपदा विभागाचे अभियंता अरूण नाईक, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्रीनिवास वर्पे, कृषी विभागाचे गायकवाड, माजी मंत्री मधुकरराव पिचड, आ.वैभव पिचड, सिताराम भांगरे, रावसाहेब वाकचौरे, सौ.सोनाली नाईकवाडी, शिवाजीराव धुमाळ, सुनील दातीर, जगन देशमुख, राहुल देशमुख, राजेंद्र डावरे, संतोष बनसोडे, रमेश राक्षे, आप्पासाहेब आवारी, गंगाधर नाईकवाडी, रामदास आंबरे, भाऊसाहेब आभाळे, गंगाराम नलावडे, भाऊसाहेब वाकचौरे, कोकणे यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी (३१ मे) सकाळी १० वाजता होणार्‍या कार्यक्रमाच्या स्थळाची पाहणी महसूलमंत्र्यांनी केली. येत्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही दौरा होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याचेही नियोजन आतापासूनच सुरू करण्याबाबतच्या सूचना महसूलमंत्री विखे यांनी यावेळी दिल्या. अकोले व संगमनेर तालुक्यातील सर्व कालव्यांची पाहणी करीत महसूलमंत्र्यांनी शेतकर्‍यांचे म्हणणे जाणून घेतले. शेतकर्‍यांच्या मागण्यांबाबत त्यांनी यावेळी आश्वासीत केले. धरणासाठी जमिनी गेलेल्या शेतकर्‍यांना गायरान जमिनी देण्यात आल्या होत्या. या जमिनीच्या बाबतीत अद्यापही प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित असल्याने याबाबत तातडीने प्रस्ताव तयार करून पाठविण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिल्या. याबाबत धोरणात्मक निर्णय शासन स्तरावर घेतला जाणार आहे.

धरणाच्या उजव्या कालव्याच्या कामाची माहिती त्यांनी जाणून घेतली. ही कामे पूर्ण होण्यास तीन महिन्याचा कालावधी लागणार असला तरी दोन महिन्यात काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवूनच ही कामे पूर्ण करण्याबाबत विभागाने कार्यवाही करावी, अशा सूचनाही महसूलमंत्र्यांनी यावेळी दिल्या. निळवंडे धरणाचे पाणी कालव्यातून सोडण्याचे भाग्य आमच्या नशिबात होते म्हणून हा क्षण आलेला आहे. कालव्यातून पाणी सोडल्यावर त्याच बरोबर सर्व वादाचे मुद्दे ही सोडून द्यावे असे ना.विखे पाटील म्हणाले.

- Advertisement -

सकाळपासून मंत्री विखे येणार म्हणून निळवंडे धरणग्रस्त धरण स्थळी उपस्थित होते. गंगाराम नलावडे, राजेंद्र डावरे,कोकने,रमेश राक्षे,शिवाजी धुमाळ,भाऊसाहेब आभाळे, भाऊसाहेब वाकचौरे आदींनी मंत्री विखे यांची भेट घेतली व निवेदन दिले निंब्रल येथे तलाठी कार्यालय बांधकाम,निळवंडे ते म्हालादेवी रस्ता डांबरीकरण,स्मशान भूमीचे सुशोभीकरण, गायरान जमिनी हस्तांतरीत करणे बाबत आदी सात मागण्या करण्यात आल्या.

तर माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी धरणग्रस्त असलेल्या माळे गाव,कोहांडी, केलुंगण या गावच्या उपसा सिंचन योजना सुरू कराव्यात तसेच पिंपरकने पुलाचे काम तातडीने पूर्ण व्हावे.तर माजी आमदार वैभवराव पिचड यांनीही कालवा प्रश्नाबाबत अनेक मुद्दे उपस्थित करून पालकमंत्री यांना विकास निधीबाबत साकडे घातले. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, माजी मंत्री पिचड यांनी पाणी अडवून तालुका नव्हे तर जिल्हा समृद्धीकडे नेण्याचे काम केले.तालुक्यातील प्रकल्पग्रस्तानी जो त्याग केला तो विसरण्यसारखा नाही.त्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतीला पाणी देणार्‍या उपसासिंचन योजना यापुढे सोलर ऊर्जेवर चालतील त्यामुळे शेतकर्‍यांना विजेचा बिलाचा फटका बसणार नाही. पिंपरकने पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे.निधी कमी पडणार नाही. लवकरच पुलाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौर्‍याचेही नियाजिन करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -