
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यंदाचा अर्थसंकल्प हा तब्बल ५२ हजार कोटींचा असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तो ६६७० कोटी जास्त आहे. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा देशातील तब्बल आठ राज्यांपेक्षा मोठा आहे. त्यामुळेच सर्वच राजकीय पक्षांचा डोळा या महापालिकेच्या सत्तेवर आहे. मुंबई महापालिकेच्या बजेटवरून आता राजकीय घमासान सुरू झालंय. मुंबईच्या बजेटवरून आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी मुंबईच्या वाढीव अर्थसंकल्पावर माध्यमांशी संवाद साधलाय. यावेळी बोलताना त्यांनी मुंबईच्या वाढलेल्या या बजेटवर अनेक प्रश्चचिन्ह उपस्थित केले. पुस्तकात कुठलाच नवीन मोठा प्रकल्प नाही मग यंदाचा बजेटमध्ये खर्च वाढला कसा, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प २०२३ आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी मांडला. यंदा मुंबई महापालिकेने विक्रमी ५२ हजार कोटीचं बजेट सादर केलं. मुंबई मनपाच्या बजेटने पहिल्यांदाच ५० हजार कोटींचा आकडा पार केला. ‘हा मुंबईकरांसाठीचं बजेट नाही तर कॉन्ट्रॅक्टरसाठीचं वर्षा बंगल्यावरून छापून आलेलं बजेट आहे, असा आरोपही यावेळी आदित्य ठाकरेंनी केलाय.
The unconstitutional state Govt and the @mybmc governed by the administrator has been showing moral and legal bankruptcy for 6 months.
Today’s BMC budget shows that it has begun to pave way for Mumbai’s financial bankruptcy. #BMCBudget2023
(1/n) pic.twitter.com/OlzSXXATA4— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 4, 2023
“तसंच लोकशाहीमध्ये एका ऑफीसरने स्वतःला लोकप्रतिनिधी समजू नये, प्रशाक म्हणून काम करत असताना महापौर किंवा नगरसेवक समजू नये. महापालिकेत सर्व अधिकार लोकप्रतिनिधींचा असतो. तरीही महापालिकेचं बजेट प्रशासकाकडून सादर झाला.”, असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले. यापुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “रस्त्यांचं बजेट २ ते २.५ कोटी पर्यंत असायचं ते आता साडे सहा हजार कोटीपर्यंत नेलं. टेंडर्स पाहिल्यानंतर पाच कॉन्ट्रॅक्टरना प्रत्येकाला एक ४८ टक्के देयक देण्यात आली आहे. त्यामुळे बीएमएसी नक्की कुणाला फसवतेय? असा संतप्त सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय.
The budget, like every year, has a clearly defined table of BMC reserves- money kept in FD and how it is engaged, for those like the illegal CM who questioned FDs.@ShivSena has worked over 25 years to bring BMC from deficit to surplus with efficient financial planning. pic.twitter.com/EN2hWdcTTk
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 4, 2023
But now that this pro contractor BMC budget has been put in public, the BMC must explain
1) hiked expenses
2) Internal Temporary Transfer concept and if it affects FDs
3) White paper on roads expense and proposed FD expenseMore so, State Govt must give its ₹7200 cr dues to BMC
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 4, 2023
स्कायवॉकमुळे शहराचं सौंदर्य कमी होतं. कुठल्याही शहरात स्कायवॉक जिथे गरज असेल तिथेच उभारले जातात. स्कायवॉकवर ७५ कोटींचं बजेट ऐकून मला धक्का दिला. जनतेचा पैसा ७५ कोटी स्कायवॉकवर घालवत आहेत. हा मुंबईकरांचा पैसा आहे तो जपून वापरा. सरकार उधळपट्टी करत आहेत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.