घरमुंबई108 रुग्णवाहिका कर्मचार्‍यांच्या संपात फूट

108 रुग्णवाहिका कर्मचार्‍यांच्या संपात फूट

Subscribe

राज्यात अत्यवस्थ होणार्‍या कोणत्याही व्यक्तीला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी कायम सज्ज असलेल्या 108 रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेले डॉक्टर व वाहनचालकांनी शुक्रवारी बेमुदत संप पुकारला होता. महाराष्ट्र माथाडी श्रमिक कामगार संघर्ष युनियनच्या माध्यामातून पुकारण्यात आलेल्या या संपामध्ये अनेक डॉक्टर व वाहनचालक सहभागी न झाल्याचे चित्र शुक्रवारी मुंबईमध्ये पाहायला मिळाले. त्यामुळे संपाला संमिश्र पाठिंबा मिळाल्याचे चित्र होते.

राज्यामध्ये 108 रुग्णवाहिकेवर तीन हजार 500 डॉक्टर तर दोन हजार 400 वाहनचालक आहेत. डॉक्टर व वाहनचालकांना 12 तास राबवून घेतले जाते. त्यामुळे 12 तासांऐवजी आठ तास काम, वेतन वाढ, डॉक्टरांना कायम स्वरुपी सेवेत रूजू करणे, सार्वजनिक सुट्या, पीएफ, ईएसआयसी सेवा सुरू करणे, अपघाती व कौटुंबिक विमा सुरू करावा, डॉक्टर व वाहनचालकांची होणारी पिळवणूक थांबवण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र माथाडी श्रमिक कामगार संघर्ष युनियनने शुक्रवारी राज्यभरात संप पुकारला होता.

- Advertisement -

संघटनेत सहभागी असलेले डॉक्टर व अन्य कर्मचारी शुक्रवारी संपात सहभागी झाले होते. परंतु जे डॉक्टर व वाहनचालक संघटनेशी संबंधित नाहीत. त्यांनी संपात सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यामुळे मुंबईत काही रेल्वेस्थानकांबाहेर 108 रुग्णवाहिका उभी असल्याचे दिसून येत होत्या. या डॉक्टर व वाहनचालकांनी संपात सहभागी होण्यास नकार दिल्याने मुंबई संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -