घरमुंबईरेल्वेच्या एसी डब्यातून १४ कोटींचे टॉवेल्स,उशा, चादरींची चोरी!

रेल्वेच्या एसी डब्यातून १४ कोटींचे टॉवेल्स,उशा, चादरींची चोरी!

Subscribe

एक वर्षात 21 लाख वस्तू गायब आता मिळतात डिस्पोजेबल टॉवेल्स

रेल्वेमधून प्रवास करत असताना पर्स किंवा पाकीट चोरीला गेल्याचे आपण ऐकतो. पण आता एक वेगळीच बाब समोर आली आहे. २०१७-१८ या वर्षामध्ये देशभरात विविध ठिकाणी रेल्वेतील एसी डब्यांमधून तब्बल १४ कोटींचे टॉवेल्स, चादरी, उशा चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उच्चभ्रूंसाठी असलेल्या रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांतूनच ही धक्कादायक आणि लज्जास्पद चोरी झालेली आहे. प्रवाशांच्या या चोरटेपणाला आळा घालण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. रेल्वेकडून प्रायोगिक तत्वावर डिस्पोजेबल टॉवेल्स देणे सुरू केले आहे. १ जानेवारी २०१९ पासून एसी डब्यात मिळणार्‍या सोयीसुविधांमध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे एका वर्षात या वस्तू गायब झाल्या आहेत.२०१७-१८ या वर्षात देशभरात रेल्वेतील एसी डब्यातून १४ कोटींचे सामान चोरीला गेले आहे.

चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये टॉवेल्स, चादरी, ब्लँकेट, उशांची कव्हर्स यासोबतच शौचालयमधील मग, नळ यांचाही समावेश आहे. एसी डब्यांमध्ये प्रवास करणार्‍या प्रवाशांना आरामदायी सुविधा देण्याचा प्रयत्न रेल्वे करीत असतानाच एसी डब्यांमधून 21 लाख 72 हजार वस्तू गायब झाल्या आहेत. यात 12 हजार टॉवेल, 4,71,077 चादरी आणि 3 लाख 14 हजार 952 उशांचे कव्हर्स चोरीला गेली आहेत. एसीतले प्रवासीच या गोष्टी चोरत असल्याची बाब समोर चौकशीतून उघड झाली आहे. या चोर्‍यांना आवर घालण्यासाठी येत्या १ जानेवारीपासून एसी डब्यात मिळणार्‍या सुविधांमध्ये बदल करण्यात येणार आहे. याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी ‘आपलं महानगर’च्या प्रतिनिधीने रेल्वे बोर्डाच्या जनसंपर्क अधिकार्‍यांशी संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही.

- Advertisement -

या व्यतिरिक्त भारतीय रेल्वेत विशिष्ट काळात एसी डब्यातून 56,287 उशा आणि 46,515 चादरी चोरीला गेल्या आहेत. रेल्वे बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, हरवलेल्या वस्तूंची एकूण किंमत 14 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यामध्ये सर्वाधिक टॉवेल्स आणि चादरी चोरीला गेल्या आहेत. रेल्वेच्या एसी कोचमध्ये नेहमीच शौचालयातील मग, नळ आणि आरसे चोरीला जातात. प्रवाशांचा प्रवास सुखकारक व्हावा यासाठी रेल्वेकडून या सुविधा देण्यात येतात, पण प्रवाशांकडून या वस्तूंच्या चोर्‍या होत असल्याने रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालय एसी डब्यात कागदी नॅपकिन्स देण्याचा विचार करत आहे.

3.9 लाख बेडरोल संच

- Advertisement -

भारतीय रेल्वेकडे सध्या 3.9 लाख बेडरोल संच आहेत. या संचात दोन टॉवेल्स, १ चादर, १ ब्लँकेट, १ उशी यांचा समावेश असतो. एसी वर्गातील प्रत्येक प्रवाशाला हा संच दिला जातो, असे रेल्वेच्या एका रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. भारतीय रेल्वेच्या १६ विभागांपैकी सर्वाधिक चोरी दक्षिण विभागात झाल्याचे दिसून आले आहे. ज्यात 2,04,113 टॉवेल्स, 29, 559 चादरी, 44,868 उशांची कव्हर्स, 3,713 उशा आणि 2,745 ब्लँकेट्स यांचा समावेश आहे.

चोरीची नोंद
१) दक्षिण मध्य विभागात

9 5,700 टॉवेल्स, 2 9, 747 उशांची कव्हर्स, 22,323 चादरी, 3,352 ब्लँकेट्स आणि 2,463 उशा

२) उत्तर विभागात

85,327 टॉवेल्स, 38,9 16 चादरी, 25,313 उशांची कव्हर्स, 3,224 उशा आणि 2,483 ब्लँकेट्स

३) पूर्व मध्य विभागात

33,234 चादरी, 22,769 उशांची कव्हर्स, 1,657 उशा, 76,852 टॉवेल्स आणि 3,132 ब्लँकेट्स

४) पूर्व विभागात

1,31,313 टॉवेल्स, 20,258 चादरी, 9, 006 उशांची कव्हर्स, 1,517 उशा आणि 1, 913 ब्लँकेट्स

रेल्वे प्रशासन नेहमीच एसी डब्यातून प्रवास करणार्‍या प्रवासांना आरामदायी प्रवासासाठी सुविधा देत असते. मात्र मागील काही दिवसांपासून एसी डब्यात मिळणार्‍या टॉवेल्स, चादरी चोरीला जात आहेत. काही प्रवासी सुशिक्षित असूनसुद्धा चोर्‍या करतात. त्यामुळे रेल्वेचे नुकसान होत आहे. आता रेल्वे १ जानेवारी २०१९ पासून या सुविधा बंद करण्याचा विचार करत आहे. मात्र रेल्वेने १४ कोटींचे टॉवेल्स, चादरी चोरीला गेल्याची चौकशी करणे गरजेचे आहे.

– हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप पुणे.

एसी डब्यात देण्यात येणार्‍या सुविधांचा निर्णय हा रेल्वे बोर्डाचा आहे. एसी डब्यातून १४ कोटींचे टॉवेल्स, चादरी चोरीला गेल्यानंतर रेल्वे बोर्डाने प्रायोगिक तत्वावर काही रेल्वे गाड्यांमध्ये टॉवेल्सच्या जागी डिस्पोजेबल टॉवेल्स देणे सुरू केले आहे. त्यांना कसा प्रतिसाद मिळतो हे पाहिल्यानंतर पुढे त्यावर विचार केला जाईल. मात्र टिशू पेपर देण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही.

– सुनिल उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -