Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Local Train Update : हार्बर रेल्वेच्या 'या' मार्गावर १४ तासांचा विशेष वाहतूक...

Local Train Update : हार्बर रेल्वेच्या ‘या’ मार्गावर १४ तासांचा विशेष वाहतूक ब्लॉक

Subscribe

हार्बर रेल्वे मार्गावरून प्रवेश करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. हार्बर रेल्वेच्या जोगेश्वरी आणि गोरेगाव या स्थानकादरम्यान १४ तासांचा विशेष वाहतूक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

हार्बर रेल्वे मार्गावरून प्रवेश करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. हार्बर रेल्वेच्या जोगेश्वरी आणि गोरेगाव या स्थानकादरम्यान १४ तासांचा विशेष वाहतूक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील हा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. (14 hour special traffic block announced between Jogeshwari and Goregaon station of Harbour Railway)

मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, पुल क्रमांक 46 चे पुनर्गर्भीकरण करण्यासाठी रेल्वे जोगेश्वरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर विशेष ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील वांद्रे आणि गोरेगाव स्थानकादरम्यानच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक, पाहा लोकलसेवेचे वेळापत्रक

विशेष वाहतूक ब्लॉकची वेळ

  • वांद्रे ते गोरेगाव मार्गावर शनिवार 20 मे रोजी रात्री 11:55 वाजल्यापासून ते रविवार 21 मे दुपारी 01:55 वाजेपर्यंत असेल.
  • गोरेगाव ते वांद्रे या मार्गावर शनिवार 20 मे रोजी रात्री 11:33 वाजल्यापासून ते रविवार 21 मे दुपारी 14:05 वाजेपर्यंत असेल.
- Advertisement -

उपनगरीय ट्रेन धावण्याची पद्धत

  • गोरेगावसाठी शेवटची लोकल GN 83 गोरेगाव लोकल असेल. ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शनिवारी रात्री 10.54 वाजता सुटेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी शेवटची लोकल GN 86 असेल. ही लोकल गोरेगाव येथून शनिवारी रात्री 11:06 वाजता सुटेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी पहिली लोकल GN 48 असेल. ही लोकल गोरेगाव येथून रविवारी दुपारी 02:33 वाजता सुटेल.
  • गोरेगावसाठी पहिली लोकल GN 45 असेल. ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रविवारी दुपारी 02:18 वाजता सुटेल.

हेही वाचा – सुंदर पिचाई यांच्या चेन्नईतील घराची विक्री; कागदपत्रांवर सही करताना वडील भावूक

- Advertisment -