घरमुंबई१७ वर्षीय लेडी हॅकर 

१७ वर्षीय लेडी हॅकर 

Subscribe

गंमत म्हणून ६५ जणांचे अकाउंट हॅक अनेक विद्यार्थिनी आत्महत्येच्या विचारात

तिने गंमत म्हणून हा सर्व प्रकार केला असून तिला तो छंदच जडला असल्याचे आता समोर आले आहे. इतकेच नाही तर अकाऊंट हॅक करण्यासाठी तिने काही मित्रांची, खोटे बोलून मदतही घेतली होती, असे चौकशीत तिने कबूल केले. तिने आपल्या बहिणीच्या नावे सिम कार्ड विकत घेऊन हॅकिंगसाठी त्या सिम कार्डचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

जोगेश्वरी पूर्व येथे राहणार्‍या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीने सप्टेंबर २०१८ मध्ये मेघवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीत तिने तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट कोणीतरी हॅक केले असून तिच्या अकाऊंटवरून अश्लील फोटोग्राफ, व्हिडिओ पाठवले असल्याचे सांगितले. तसेच तक्रारदार विद्यार्थिनीच्या ‘इन्स्टाग्राम’ वरील मित्रांचे-देखील अकाऊंट हॅक करण्यात आले असल्याची तक्रार तिने दाखल केली होती. मेघवाडी पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिकार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या विद्यार्थिनी पाठोपाठ मेघवाडी पोलीस ठाण्यात पश्चिम उपनगरातील सुमारे ६० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अशाच स्वरुपाचे तक्रार अर्ज दाखल केले. तक्रारींमध्ये मुलींचे प्रमाण जास्त होते. या सर्व तक्रार अर्जांत सारखेपणा असल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू करताना संलग्न तपास गुन्हे शाखा कक्ष-10 नेही केला.

- Advertisement -

गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू केला असता पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली. एवढ्या मोठ्या संख्येने इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करणारी व्यक्ती ही केवळ १७ वर्षांची तरुणी असल्याचे समजले. माहिती मिळताच पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिचे मोबाईल फोन, घरातील कॉम्प्युटर आदी जप्त केले. तसेच तिचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले. तिच्याकडे चौकशी केली असता तिने या सर्वांचे अकाऊंट हॅक केल्याचे मान्य केले. अधिक तपासात ही हॅकर अंधेरी परिसरात राहणारी असून पश्चिम उपनगरातील एका नामांकित कॉलेजमधील विज्ञान शाखेची विद्यार्थिनी असल्याचे समोर आले आहे. जोगेश्वरीच्या मेघवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देणारी विद्यार्थिनी सदर तरुणीच्या संपर्कात असून तिने सर्वप्रथम तिचे अकाऊंट हॅक केले. त्यानंतर त्या विद्यार्थिनीच्या मित्र आणि मैत्रिणींचे अकाऊंटही हॅक केल्याची कबुली तिने मेघवाडी पोलिसांना दिली.

सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनत असताना त्याचे दुरुपयोगही समोर येऊ लागले आहेत. एका हॅकरने पश्चिम उपनगरातील सुमारे ६० ते ६५ कॉलेज विद्यार्थी, विद्यार्थिनींचे ‘इन्स्टाग्राम’अकाऊंट हॅक केले. त्यावरून अश्लील संदेश,फोटो आणि व्हिडिओ पाठवून त्या सर्वांचे जगणे मुश्किल केले. या हॅकरला मुंबई पोलिसांनी अंधेरी परिसरातून ताब्यात घेतले असून हॅकर तरूण नसून ती १७ वर्षीय तरुणी आहे. विशेष म्हणजे गंमत म्हणून तिने हा सर्व प्रकार केला, पण तिच्या गमतीमुळे अनेक विद्यार्थिनी नैराश्यग्रस्त झाल्या तर काहींनी आत्महत्येचाही विचार केल्याची धक्कादायक माहिती समजली आहे.

- Advertisement -

विलेपार्ले येथील नामांकित कॉलेजमध्ये ही १७ वर्षीय विद्यार्थिनी शिकत होती. काही महिन्यांपूर्वीच या विद्यार्थिनीने धर्मांतर करीत ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला होता. अंधेरी येथे ही तरुण राहत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. (विद्यार्थिनी अल्पवयीन असल्याने तिची ओळख दिलेली नाही.)

गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या 17 वर्षाच्या या तरुणीला मेघवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले असून मेघवाडी पोलिसांनी तिला माहिती तंत्रज्ञान अधिकार कायद्यांतर्गत अटक केली आहे. पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तरुणीच्या या कृत्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे ब्रेकअप झाले असून काही विद्यार्थिनी तर या प्रकारामुळे नैराश्यग्रस्त झाल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -