घरमुंबईलालबागचा राजा आरोग्योत्सवात २४६ जणांचे प्लाझ्मादान; १० हजारांहून अधिकांनी केलं रक्तदान

लालबागचा राजा आरोग्योत्सवात २४६ जणांचे प्लाझ्मादान; १० हजारांहून अधिकांनी केलं रक्तदान

Subscribe

कोविड काळातील अनेक कोविड सेनानींचा सन्मान या आरोग्योत्सवात करण्यात आला.

यंदा जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता आणि सुरक्षाकारणास्तव कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या हेतूने लालबागच्या राजाची मूर्तीची प्रतिष्ठापना न करता फक्तं आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून घेण्यात आला.

दरम्यान, जीवदान ठरू शकणाऱ्या या आरोग्योत्सव अंतर्गत मंगळवार, ४ ऑगस्ट २०२० पासून प्लाझ्मादान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्लाझ्मादान शिबिरामध्ये आतापर्यंत एकूण २४६ प्लाझ्मादात्यांनी प्लाझ्मादान केले आहे. यासह २२ ऑगस्ट २०२० पासून सुरू असलेल्या रक्तदान शिबिरात ३० ऑगस्ट २०२० पर्यंत एकूण १० हजार २७६ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

- Advertisement -

यावेळी कोविड काळात कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्र व मुंबईतील १११ पोलिसबांधव शहीद झाले. त्यापैकी आतापर्यंत एकूण १०१ शहीद वीर पोलीसांच्या कुटुंबियांना मंडळाच्या वतीने शौर्य चिन्ह व प्रत्येकी रूपये एक लाख देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. तर भारत व चीन सीमेवर चिनीशत्रूशी लढताना गलवान खोर्यात भारताचे २२ वीर जवान शहीद झाले. या वीर शहीद जवानांच्या कुटुंबियांना मंडळाच्या वतीने शौर्य चिन्ह व प्रत्येकी रूपये दोन लाख प्रदान करण्यात आले.


Ganesh Visatjan 2020 Live : पुण्यातील मानाच्या चार गणपतींचे विसर्जन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -