घरमुंबईउल्हासनगर येथे इमारतीचा स्लॅब कोसळून चिमुरड्याचा मृत्यू

उल्हासनगर येथे इमारतीचा स्लॅब कोसळून चिमुरड्याचा मृत्यू

Subscribe

उल्हासनगर येथे इमारतीचा स्लॅब कोसळून एका चार वर्षीय चिमुरडयाचा मृत्यू झाला आहे.

दोन दिवस चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे कॅम्प ३ पवई येथील अंबिका सागर या इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत नीरज सातपुते या ४ वर्षीय चिमुरडयाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उल्हासनगर कॅम्प ३ पवई परिसरात अंबिका सागर या इमारतीमध्ये ही घटना घडली असून याप्रकरणी चौकशी सुरु आहे.

इमारतीच्या स्लॅबला गळती

अंबिका सागर या पाच मजली इमारतीमध्ये २५ सदनिका आणि पाच दुकाने आहेत. या इमारतीच्या स्लॅबला गळती लागल्याने पत्र्यांचे शेड टाकण्यात आले आहे. हे शेड काही ठिकाणी नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी इमारतीच्या टेरेसवर जमले होते. ते पाचव्या मजल्यावर गळत असल्याने ५०१ सदनिकेचा मालक रमेशचंद नागदेव हा दुसरीकडे विस्थापित झाला होता. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील ४०१ या सदनिकेत तात्याराव सातपुते यांचे कुटुंब राहते. त्यांच्या बेडरूमचा स्लॅब हा कमकुवत झालेला असतानाही शनिवारी रात्री सातपुतेंची पत्नी पंचशीला आणि त्यांचा नातू निरज हे झोपले. सकाळी ६ च्या सुमारास ५०१ या सदनिकेचा स्लॅब कोसळून या दुर्घटनेत मलब्याखाली दबून निरज सातपुते या ४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशामल दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन निरज आणि त्याच्या आजीला मलब्यातून काढून मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. तिथे निरजला मृत घोषित करण्यात आले. निरजची आजी पंचशीला सातपुते या गंभीर जखमी झाल्या आहेत. स्थानिक शिवसेना नगरसेवक राजेंद्र चौधरी, नगरसेविका शुभांगी बेहनवाल, मनोहर बेहेनवाल, शाखाप्रमुख मलंग शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले.
उल्हासनगर महापालिका प्रशासनाने तात्काळ इमारत रिकामी करण्यासाठी हालचाली सुरु केल्या. पावसाच्या सरी कायम असल्याने रोख रक्कम, आवश्यक कागदपत्रे, सोने नाणे घेऊन रहिवाशांना इमारत सोडण्यास सांगितले. तसेच इमारत सिल करण्याची प्रक्रिया पालिकेने सुरु केली होती.

पाचव्या आणि चौथ्या मजल्याला गळती 

टेरेसवर जमलेले पाणी पाचव्या आणि तेथून चौथ्या मजल्यावर गळत असल्याचे दिसून आले. चौथ्या मजल्याच्या घरांमध्ये भांडी लावून गळणारे पाणी जमा केले जात होते. इमारतीच्या पिलरला ही तडे गेले आहेत, असे असताना ही रहिवाशांच्या इमारत खाली करणे टाळत इमारतीत आपला रहिवास कायम ठेवला.

हेही वाचा – अंबरनाथमधील जीआयपी धरणाला भगदाड


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -