घरमुंबईआरटीई प्रतीक्षा यादीतील ४४९ विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश

आरटीई प्रतीक्षा यादीतील ४४९ विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश

Subscribe

प्रतीक्षा यादीतील प्रवेशाची अंतिम मुदतवाढ गुरुवारी संपली. रिक्त जागांसाठी पुढील १० दिवसांत आणखी एका फेरीचे नियोजन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आरटीई प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी यासाठी मुदतवाढ देऊनही निवड झालेल्या १३२८ पैकी फक्त ४४९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. प्रतीक्षा यादीतील प्रवेशाची अंतिम मुदतवाढ गुरुवारी संपली. रिक्त जागांसाठी पुढील १० दिवसांत आणखी एका फेरीचे नियोजन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी एकाचवेळी ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात आली होती. त्यानुसार १७ मार्चला काढण्यात आलेल्या प्रथम सोडतीत निवड झालेल्या ५३७१ विद्यार्थ्यांपैकी ३१३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली. प्रतीक्षा यादीसाठी निवड झालेल्या १३२८ विद्यार्थ्यांपैकी फक्त ४४९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चिती केली. विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने प्रवेशासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात येऊनही फारच कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -