घरमुंबई६२ वर्षीय व्यक्तीने केलेल्या अवयवदानातून वाचले तिघांचे प्राण

६२ वर्षीय व्यक्तीने केलेल्या अवयवदानातून वाचले तिघांचे प्राण

Subscribe

मुंबईत राहणाऱ्या एका ६२ वर्षीय व्यक्तीने केलेल्या अवयवदानामुळे तिघांना नव्याने जीवदान मिळालं आहे. गुरुवारी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये यंदाच्या वर्षातील चौथं अवयवदान पार पडलं आहे.

मुंबईत राहणाऱ्या एका ६२ वर्षीय व्यक्तीवर १४ जानेवारीपासून ज्युपिटर रूग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना ब्रेन हेमरेजचा त्रास होता. पण, उपचारांदरम्यान १७ जानेवारीला त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आलं. गेल्या ६ वर्षांपासून दोन्ही किडन्या फेल झाल्यामुळे ही व्यक्ती डायलिसीसवर होती. त्यामुळे नातेवाईकांना अवयवदानाचं महत्त्व किती आहे? हे माहित होतं. या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी अवयवदानाची तयारी दर्शवली. त्यानुसार, या रूग्णाचे अवयवदान करण्यात आले. या अवयवदानात यकृत, डोळे आणि त्वचा दान करण्यात आली आहे. तर, रुग्णाची किडन्या आधीच निकामी असल्यामुळे त्या दान करता आल्या नाहीत.

डॉक्टरांनी दिली ही प्रतिक्रिया

याविषयी ज्युपिटर हॉस्पिटलचे समन्वयक अनिरूद्ध कुलकर्णी यांनी सांगितलं, “अवयवदान करणारी ही ६२ वर्षीय व्यक्ती होती. या व्यक्तीला ब्रेन हेमरेजचा त्रास होता. १४ तारखेला या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या किडनी आधीच फेल झाल्या होत्या. त्यामुळे ते डायलिसीसवर होते. या व्यक्तीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पण, उपचारांना प्रतिसाद न दिल्याने १७ जानेवारीला त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आलं. या व्यक्तीच्या कुटुंबियांना अवयवदानाची माहिती असल्याने त्यांनी स्वतः अवयवदान करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार, रूग्णाचं यकृत, डोळे आणि त्वचा दान करण्यात आलेत. यकृत ज्युपिटर हॉस्पिटलमधील एका ६९ वर्षीय महिलेला दान करण्यात आलंय. ही महिला ८ ते ९ महिन्यांपासून प्रतिक्षा यादीत होती. तर, डोळे साहियारा आय बँकमध्ये आणि त्वचा ऐरोलीच्या नॅशनल बर्न सेंटरमध्ये देण्यात आली आहे. या व्यक्तीला हृदय ही दान करायचं होतं. पण, वयोमर्यादा ५५ वर्ष असल्याकारणाने ते करता आलं नाही.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -