घरताज्या घडामोडीमाटुंग्यात हाॅटेलवर झाडाची फांदी कोसळून वयोवृद्धाचा मृत्यू

माटुंग्यात हाॅटेलवर झाडाची फांदी कोसळून वयोवृद्धाचा मृत्यू

Subscribe

घटनेनंतर काही नागरिकांनी तात्काळ धावपळ करून गंभीर जखमी अजित तुळसकर यांना बाहेर काढून त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

माटुंगा (पश्चिम) येथे एका हॉटेलवर अचानकपणे झाडाची मोठी फांदी कोसळून एका ६४ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या  सुमारास घडली आहे. माटुंगा ( पश्चिम), कटारिया मार्ग, मोगल लेन येथे गंगा विहार हॉटेलवर शेजारील एका झाडाची मोठी फांदी अचानकपणे कोसळली. या दुर्घटनेत अजित तुळसकर या वयोवृद्ध व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

गंगाविहार हॉटेलवर झाडाची फांदी कोसळली त्यावेळीस अजित तुळसकर हे त्या ठिकाणी होत. झाडाची फांदी कोसळल्यानंतर ते गंभीररित्या जखमी झाले. घटनेनंतर काही नागरिकांनी तात्काळ धावपळ करून गंभीर जखमी अजित तुळसकर यांना बाहेर काढून त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

- Advertisement -

सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. नागरिकांची गर्दी जमली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य युद्धपातळीवर हाती घेतले. हॉटेलवर पडलेली झाडाची फांदी काढून टाकली असून रस्ता देखील मोकळा करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Corona Update : मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट, २४ तासांत २७ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -