घरताज्या घडामोडीछत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त उद्या शिवतीर्थावर महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून...

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त उद्या शिवतीर्थावर महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून करणार पुष्पवृष्टी

Subscribe

उद्या शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यावर  मनसे अध्यक्ष राज ठाकरे, नेते अमित ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर मनसे नेते अमित ठाकरे हे अभिषेक आणि पूजन करणार आहेत. 

महाराष्ट्रात २१ फेब्रुवारीला तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती साजरी केली जाते. यंदाच्या शिवजयंतीनिमित्त मनसे पक्षाने जोरदार तयारी केली असून  मुंबईत साजरी होणारी शिवजयंती देखील खास असणार आहे कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना शिवजयंती निमित्त शिवतीर्थावर खास आमंत्रण दिले आहे. उद्या शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यावर  मनसे अध्यक्ष राज ठाकरे, नेते अमित ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर मनसे नेते अमित ठाकरे हे अभिषेक आणि पूजन करणार आहेत.

शिवतीर्थावर होणाऱ्या उद्याच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन आयोजन दरवर्षी प्रमाणे मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर व सरचिटणीस शालीनी ठाकरे यांनी केलेल आहे. उद्या होणा-या शिवजयंतीच्या निमित्ताने ढोलताशांच्या गजरात हा भव्यदिव्य सोहळा शिवतीर्थ परीसरात होणार आहे.

- Advertisement -

उद्या होणा-या या दिमाखदार सोहळ्यास तमाम शिवभक्त, पक्षाचे नेते, सरचिटणीस, प्रमुख पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक हे मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा विश्वास मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी व्यक्त केला आहे.

मनसे पक्षाच्या १६ व्या वर्धापन दिनी भाषण करताना राज ठाकरे यांनी येत्या 21 मार्च रोजी मनसे तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार असे ठणकावून सांगतिले होते. हा केवळ ट्रेलर असून पिक्चर शिवजयंतीला शिवतीर्थावर असे राज ठाकरे म्हणाले होते. त्याचप्रमाणे गुढी पाडव्याचा सणही दणक्यात साजरा करण्याचे निर्देश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले होते.

- Advertisement -

हेही वाचा –  शिवाजी महाराज, रामदास स्वामी… राज्यपालांना काही कळतं का?, राज ठाकरे कडाडले

हेही वाचा – मंत्री धुडगूस घालताहेत मग शिवजयंती, मराठी भाषा दिनाला नकार का?–राज ठाकरे बरसले

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -