घरमुंबईमुंबईतील घरांसाठी ८ हजार अर्ज

मुंबईतील घरांसाठी ८ हजार अर्ज

Subscribe

म्हाडाच्या मुंबई मंडळाअंतर्गतच्या लॉटरीसाठी ८२५९ जणांनी अर्ज भरले आहेत. अर्जदारांपैकी २८९३ जणांनी अर्जासोबतची अनामत रक्कम भरली आहे. ७ मार्चपासून मुंबई मंडळातील घरांच्या नोंदणीसाठी सुरूवात झाली आहे. सदनिका आणि दुकानांच्या गाळ्यांसाठी म्हाडाकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. येत्या १३ एप्रिलपर्यंत या सोडतीअंतर्गत घरांसाठी अर्ज करता येणार आहेत.

सदनिका सोडतीत अल्प उत्पन्न गटासाठी सहकार नगर, चेंबूर येथील १७० सदनिका तर मध्यम उत्पन्न गटासाठी सहकार नगर-चेंबूर, कोपरी-पवई येथील ४७ सदनिकांचा समावेश आहे. दुकानांच्या गाळ्यांच्या ई लिलाव प्रक्रियेत मुंबई मंडळांतर्गत असलेल्या प्रतीक्षा नगर-शीव (सायन), न्यू हिंद मिल-माझगाव, विनोबा भावे नगर-कुर्ला, स्वदेशी मिल-कुर्ला, तुर्भे मंडाले-मानखुर्द, तुंगा पवई, गव्हाणपाडा-मुलुंड, मजासवाडी-जोगेश्वरी, शास्त्री नगर-गोरेगाव, सिद्धार्थ नगर-गोरेगाव, चारकोप, मालवणी-मालाड येथील २०१ गाळ्यांचा समावेश आहे. तर कोकण मंडळांतर्गतच्या विरार बोळींज, वेंगुर्ला सिंधुदुर्ग येथील ७७ गाळ्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

मुंबई मंडळाची सदनिका सोडत २१ एप्रिल, २०१९ रोजी सकाळी दहा वाजता वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात होणार आहे. सदनिका सोडतीबाबत माहितीपुस्तिका व अर्जाचा नमुना https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुंबई व कोकण मंडळांतर्गतच्या दुकानी गाळ्यांचा लिलाव ८ एप्रिल, २०१९ रोजी सकाळी ११ वाजता https://eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -