Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई Mumbai Police : मुंबई पोलिसांतील 9 उपआयुक्तांच्या झाल्या बदल्या

Mumbai Police : मुंबई पोलिसांतील 9 उपआयुक्तांच्या झाल्या बदल्या

Subscribe

मुंबई पोलीस दलामधील 09 पोलीस उपायुक्तांच्या आज बुधवारी (ता. 24 मे) खात्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी बदली होऊन आलेल्या अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

मुंबई पोलीस दलामधील 09 पोलीस उपायुक्तांच्या आज बुधवारी (ता. 24 मे) खात्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी बदली होऊन आलेल्या अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या करण्यात आलेल्या आहेत. गेल्या महिन्याभरात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. तर काही अधिकाऱ्यांच्या पदोन्नती करत त्यांना बढती देखील देण्यात आलेली आहे. पण आता पुन्हा एकदा मुंबईतील 09 अधिकाऱ्यांच्या खात्यांतर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत या अधिकाऱ्यांना बदल्या करण्यात आल्याचे प्रमाणपत्राच्या प्रती देण्यात येणार आहेत.

हेही वाचा – आरक्षणात गैरप्रकार : गणेशोत्सवासाठी अतिरिक्त रेल्वेगाड्या कोकणात सोडाव्यात, अजित पवारांचं पत्र

- Advertisement -

बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये प्रविण मुंढे (परिमंडळ-४) यांची परिमंडळ-१ मध्ये, मोहित कुमार गर्ग (गुन्हे शाखा, प्रतिबंधक) यांची परिमंडळ-२ मध्ये, प्रशांत कदम (गुन्हे शाखा, प्रकटीकरण) यांची परिमंडळ-४ मध्ये, कृष्णकांत उपाध्याय (गुन्हे शाखा, प्रकटीकरण – १) यांची परिमंडळ९ मध्ये, दत्ता नलावडे यांची परिमंडळ-१० मध्ये, महेश रेड्डी (परिमंडळ-१०) यांची मुख्यालय १ मध्ये, अमोघ गावकर यांची गुन्हे शाखा (प्रतिबंधक) खात्यामध्ये, हरी बालाजी (परिमंडळ-१) यांची विशेष शाखा -१ या खात्यामध्ये आणि बालसिंग रजपुत यांची गुन्हे शाखा (प्रकटीकरण) या खात्यामध्ये बदली करण्यात आलेली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे यांतील काही अधिकाऱ्यांच्या वर्षभरापूर्वी बदल्या करण्यात आलेल्या होत्या. पण आता पुन्हा एकदा त्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. तसेच येत्या काही दिवसांत या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे प्रमाणपत्र प्रती अधिकाऱ्यांना देण्यात याव्यात, असे आदेश देण्यात आलेले आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -