मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतरच माझ्यावर गुन्हा दाखल; आव्हाडांचा दावा

महाविकास आघाडीमधील गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत एक मोठा निर्णय घेतला आहे.

तक्रादार महिलेने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shidne ) यांची भेट घेतल्यानंतर गुन्हा दाखल केला असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी ट्विट करत आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. जितेंद्र आव्हाड यांनी हा निर्णय घेतल्या नंतर राजकीय वर्तुळात मात्र एकच चर्चा सुरु आहे. पोलिसांनी 72 तासांमध्ये माझ्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केले असा आरोप सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट मधून केला आहे.

महाविकास आघाडीमधील गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी ट्वीट करत एक मोठा निर्णय घेतला आहे. आव्हाडांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे ट्वीटमध्ये म्हटले आहे. पोलिसांनी 72 तासांमध्ये दोन खोटे गुन्हे दाखल केले असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी मी पाहू शकत नाही, असं जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. हर हर महादेव चित्रपटात चुकीचा इतिहास दाखविल्याने विवियाना मॉलमध्ये झालेल्या वादंगाप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान त्याप्रकरणी आव्हाडांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. मात्र काल कळवा-मुंब्रा येथील नवीन पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान महिलेने विनयभंगाचा आरोप केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हे दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे त्यांच्या ट्विटमधून सांगितले आहे.

दरम्यान रविवार 13 नोव्हेंबर 2022 रोजी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे (shrikant shinde), आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) हे देखील उपस्थित होते. याच कार्यक्रमात आव्हाडांविरोधात तक्रार करणारी महिला सुद्धा उपस्थित होती. याच कार्यक्रमात विनयभंग झाल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला आहे. 40 वर्षीय तक्रारदार महिलेने या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत बाजूला केल्याचा दावा केला आहे. त्यानंतर महिलेने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पोलिसांनी महिलेला तक्रार दाखल करण्यास सांगितले. मुंब्रा पोलीस ठाण्यात या महिलेने जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली आहे. याच तक्रारीवरुन पोलिसांनी राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


हे ही वाचा – राहुल गांधी घेणार भारत जोडो यात्रेत ब्रेक, ‘हे’ कारण आलं समोर