घरमुंबईमेट्रोसाठी अतिरिक्त आयुक्त पोहचले चिटणीस कार्यलयात

मेट्रोसाठी अतिरिक्त आयुक्त पोहचले चिटणीस कार्यलयात

Subscribe

आयुक्तांना मेट्रो प्रस्ताव मंजूर केल्यानंतर त्याची प्रमाणित प्रत दिली नाही. म्हणून अतिरिक्त आयुक्त यांनी प्रमाणित प्रत मिळवण्यासाठी चिटणीस यांच्या कार्यलयात पोहचले.

मेट्रो रेल्वे ३ प्रकल्पासाठी ‘आरे’तील झाडे कापण्याच्या प्रस्ताव मंजूर केल्यानंतर याची प्रमाणित प्रत (अ‍ॅबस्टॅक्ट) मिळवण्यात प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहे. परंतु आयुक्तांनी तीन ते चार वेळा चिटणीस यांना आपल्या दालनात बोलवूनही त्यांनी ही प्रत देण्याबाबत कोणताही निर्णय न घेल्याने अखेर आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जल्हाड, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल तसेच सह आयुक्त चंद्रशेखर चौरे यांनी चिटणीस यांच्या कार्यलयात पायधूळ झाडत त्यांच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. चिटणीस यांनी थेट आपल्या दालनात यायला भाग पाडल्याने सनदी अधिकाऱ्यांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचला आहे. त्यामुळे याची किंमत मोजावी लागेल असा गर्भित इशारा त्यांनी दिल्याचे बोलले जात आहे.

नियमावर बोट ठेवल्यामुळे प्रमाणित प्रत मिळवण्याचा प्रयत्न असफल

आरेतील मेट्रो प्रकल्प ३ साठी उभारण्यात येणार्‍या कारशेडच्या बांधकामात अडथळा ठरणारी झाडे कापण्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या विरोधानंतही मंजूर करण्यात आला. आयुक्तांनी रडीचा डाव खेळल्यामुळे आता शिवसेनेनेही त्यांना कोंडीत पकडण्यास सुरुवात केली. एखादा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्या मंजूर प्रस्तावाची प्रमाणित पत्र मिळाल्यानंतरच कार्यादेश दिला जातो. किंबहुना त्या आधारे कामाला सुरुवात केली जाते. त्यामुळे वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर याची प्रमाणित पत्र, प्रशासनाला देण्यात येवू नये, असे पत्र स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी महापालिका चिटणीस यांना पाठवले आहे. मात्र, दुसरीकडे आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी याची प्रमाणित प्रत मिळावी म्हणून चिटणीस यांना देण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. तब्बल तीन ते चार वेळा आयुक्तांनी, चिटणीस प्रकाश जेकटे यांना आपल्या दालनात बोलावून घेतले. परंतु रात्रीपर्यंत चिटणीस यांनी नियमावर बोट ठेवल्यामुळे प्रमाणित प्रत मिळवण्याचा प्रयत्न असफल ठरला.

- Advertisement -

हेही वाचा मेट्रोच्या प्रस्तावासाठी शिवसेनेकडून प्रशासनाची कोंडी

चिटणीस कार्यालयात बसले ठाण मांडून 

त्यामुळे आयुक्तांनी, सहआयुक्त चंद्रशेखर चौरे यांच्यावर हे काम फत्ते करण्याची जबाबदारी सोपवली. सोबतीला अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्‍हाड यांना पाठवले. त्यामुळे दोघेही चिटणीस यांच्या कार्यालयात ठाण मांडून बसले.आयुक्त अधिकाऱ्यांना पाठवून दबाव आणत असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना समजताच त्यांनीही चिटणीस यांचे कार्यालय गाठले. त्यावेळी चौरे तिथे बसलेले दिसले. मात्र जाधव यांनी विचारणा करताच ते गोंधळले. त्यामुळे चौरे यांनी एसएमएस द्वारे आयुक्तांना दिली. त्याबरोबर अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल तिथे आले. यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. पण त्यानंतर सिंघल, चिटणीस यांना बाहेर घेऊन गेले.

- Advertisement -

प्रस्तावात बदल करत प्रमाणित प्रत मिळवण्याचा प्रयत्न

दोन अतिरिक्त आयुक्तांच्या माध्यमातून आयुक्तांनी हा दबाव वाढवल्याचे दिसत होते. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपण महापालिका चिटणीस यांना प्रमाणित प्रत देवू नये, असे पत्र दिल्याचे कबुल केले आहे. आयुक्तांनी खेळलेल्या रडीचा डावाबद्दल त्यांना धडा शिकवणार, असा यशवंत जाधव निर्धार केला आहे. आयुक्त हे स्वतः प्रयत्न करत आहेत शिवाय अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड आणि विजय सिंघल तसेच सह आयुक्त चंद्रशेखर चौरे यांना पाठवून मंजूर प्रस्तावात बदल करत प्रमाणित प्रत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

नक्की वाचाआचारसंहितेच्या भीतीनेच मेट्रोचा प्रस्ताव मंजूर!

यशवंत जाधव यांचा आरोप

आपण तिथे जेव्हा पोहोचलो तेव्हा हे तिघे तिथे होते आणि आपल्याला पाहून गोंधळले. तसेच चिटणीस यांना कागदपत्रे घेऊन बाहेर नेले. त्यावेळी आयुक्त आपल्या दालनात होते. त्यामुळे असा दबाव आणून त्यात बदल केला जात असल्याचा आरोप यशवंत जाधव यांनी केला. एका छोट्या कामासाठी आम्हाला तुमच्या कार्यालायत यावे लागले, हे लक्षात ठेवा. तुम्ही काय मोठे लागून गेला आहात काय, याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल, असा दमच सिंघल यांनी चिटणीस यांना दिल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले.

प्रस्ताव मंजूर केल्याने याविरोधात शिवसेनेने न्यायालयात जाणार

झाडे कापण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाने गैर मार्गाने प्रस्ताव मंजूर केल्याने याविरोधात शिवसेनेने न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार शिवसेनेने तयारी केली असून स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी अर्ज केला आहे.


हेही वाचा मेट्रोसाठी होणाऱ्या वृक्षतोडीवर एकाच तज्ज्ञाने उघडले तोंड


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -