घरमुंबईशिवडीतील बीपीटी हद्दीमधील रस्त्यांवरील अंधारी दूर; तब्बल ४० वर्षांनी!

शिवडीतील बीपीटी हद्दीमधील रस्त्यांवरील अंधारी दूर; तब्बल ४० वर्षांनी!

Subscribe

पुढील १५ दिवसांत आणखी दहा दिवे लावण्यात येणार आहेत.

अंधाऱ्या ठिकाणी गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याने महिला, तरुणी यांना सुरक्षित वाटत नाही. खासकरून मुंबईतील शिवडी येथील बीपीटी हद्दीतील काही रस्त्यांवर आजही दिवे नसल्याने अंधारी स्थिती आहे. मात्र, शिवसेनेचे प्रभाग क्रमांक २०६ मधील नगरसेवक सचिन पडवळ यांच्या अथक प्रयत्नांनी शिवडी येथील या अंधारी रस्त्यांवर प्रथमच प्रायोगिक स्तरावर एक दिवा लावला आहे. त्यामुळे काही प्रमाणात येथील अंधार सरला आहे. तसेच पुढील १५ दिवसांत आणखी दहा दिवे लावण्यात येणार आहेत. वास्तविक, केंद्र सरकारच्या ‘निर्भया’ निधीचा वापर करून आगामी काही दिवसांतच २० पेक्षाही जास्त रस्त्यांवर सौर ऊर्जेचे दिवे लावले जाणार आहेत.

परवानग्या घेण्यासाठी खूप कालावधी

शिवडी विभाग हा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हद्दीत आहे. त्यामुळे या विभागात कोणत्याही प्रकारची विकास कामे करताना बीपीटी प्रशासनाच्या विविध परवानग्या घेण्यासाठी बऱ्याचदा खूप कालावधी लागतो. या विभागातील फाॅसबेरी रोड, रामगड, इंदिरा नगर परिसरात रस्त्यांवर विजेचे दिवे नसल्याने अंधारमय परिस्थिती असते. परिणामी संध्याकाळनंतर या रस्त्याने ये-जा करण्यास अनेकांना भीती वाटते. मात्र, शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी या परिसरात दिवे लावण्याचे आश्वासन दिले होते. आता त्याची पूर्तता करण्यात येत आहे.

- Advertisement -

शिवडीसाठी साडेतीन कोटी मंजूर  

गेल्या काही वर्षांत देशात घडलेल्या निर्भया प्रकरणांनंतर सर्वोच्च न्यायालयाने अंधारे रस्ते व गल्ल्यांमध्ये विजेचे दिवे बसवण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले होते. संबंधित राज्ये, महापालिकांना निधी देण्याचे आदेश केंद्राला दिले आहेत. त्यानुसार, मुंबई पालिकेला निर्भया निधी अंतर्गत साडेआठ कोटी रुपये मिळाले आहेत. याच निधीमधून शिवडी आणि आसपासच्या परिसरातील विजेचे दिवे व इतर कामांसाठी साडेतीन कोटी रूपये मंजूर झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -