घरमुंबईरवी राणांच्या कुजबूजीनंतर एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले...

रवी राणांच्या कुजबूजीनंतर एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले…

Subscribe

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Tours) असून त्यांनी आज रामलल्लाचे दर्शन घेतले असून नवीन राम मंदिराच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी स्वागत समारंभात रवी राणांच्या कुजबूजीनंतर उद्धव ठाकरेंवर निशाला साधला. रवी राणा (Ravi Rana) आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर देशद्रौह्याचा आरोप लावून त्यांना जेलमध्ये टाकण्याचे पाप केले आहे, असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातून आलेले मंत्री, खासदार, आमदार, कार्यकर्त्यांसह रामलल्लाचे दर्शन घेतले. यावेळी आमदार रवी राणा यांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभू रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय अशा घोषणा देताना आपल्या भाषणाला सुरूवात केली. यावेळी रवी राणा यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत कुजबूज केली आणि त्यानंतर शिंदे यांनी भाषणाला सुरूवात केली.

- Advertisement -

शिंदे म्हणाले की, रवी राणा अयोध्येतील माती अमरावतीला घेऊन जाणार आहेत आणि त्याठिकाणी ते 111 फुट हनुमानाची भव्य मूर्ती उभारणार आहेत. ही आमच्यासाठी भरपूर मोठी गोष्ट आहे. आम्ही अयोध्येमध्ये रामलल्लाचे दर्शन घेतले आहे आणि रामलल्लाच्या नवीन मंदिराचे कामही पाहिले आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की, यावेळी प्रभू रामचंद्र यांचे धनुष्यबाण घेऊन आम्ही याठिकाणी आलो आहोत आणि मुख्यमंत्री बनल्यानंतर मी पहिल्यांदाच याठिकाणी आलो आहे.

यावेळी बोलताना शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की जे बोलतात रावनराज्य आहे त्याच लोकांनी राम भक्त हनुमान यांची हनुमान चाळीसा पठण करणाऱ्या रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा या दोघांना देशद्रोह्याच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकण्याचे पाप केले होते. असे बोलताना त्यांनी समोर बसलेल्या जनतेला प्रश्न केला की, हे पाप करणारे रावण आहेत की राम आहे हे सांगा. त्यांच्या प्रश्नाला जनतेनेही रावण आहेत, असे उत्तर दिले. एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रात जेव्हा साधुंची हत्या झाली तेव्हा हे शांत बसले होते. पण आमच्या सरकारमध्ये साधु हत्या होणार नाही आणि गोर-गरीबांवर अन्याय होणार नाही. आमचे सरकार साधुंचा सन्मान करणार आणि त्यांची रक्षा करणारे आहे. महाराष्ट्रमध्ये प्रभू श्री राम यांच्या आशीर्वादाने बनलेले सरकार काम करत आहे, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -